वचन (अलक)
ओठांवर गोड हसू आणि डोळ्यात अश्रू घेऊन समोर एकटक लग्नमंडपाकडे पाहत होती ती.
तिच्या प्रेमाला कोणा दुसरीचा होताना बघत होती.
कारण तिनेच तर त्याच्याकडून वचन घेतलेल, जेव्हा केव्हा अशी वेळ येईल ज्यामध्ये त्याला त्याचं कुटुंब किंवा त्यांचं प्रेम यापैकी एकच निवडता येईल, तेव्हा तो त्याचं कुटुंब निवडेल.
-Its_anu_lekha