कठीण असं काही नसतं...
कठीण असं काही नसतं...!
सुरूवात नवी म्हणून, गळून पडायचं नसतं
सतत प्रयत्नाने हवं ते मिळवायचं असतं
यशोमार्गातील अडथळ्यांना धैर्याने गिरवायचं असतं
सतत येणाऱ्या अडचणींना मागे हटायचं नसतं
लोकांच्या नजरेत पडण्याच्या भीतीने खचून जायचं नसतं
इतर करतात म्हणून, स्वतःही तसच करायचं नसतं
ध्येय पुढे ठेऊन, प्रयत्नरत रहायचं असतं
वाटेत लागला दगड म्हणून, लगेच पडायचं नसतं
हात दिला कोणी म्हणून, आधार घ्यायचं नसतं
स्वतः उठून, परत मार्ग गाठायचं असतं
थकलो म्हणून कोलमडून पडायचं नसतं
इतरांच्या व्यंगाला लगेच उत्तरायचं नसतं
योग्य वेळी संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचं असतं
अपयश आलं म्हणून, रडत बसायचं नसतं
उठून परत ठरवलेल्या ध्येयाच्या मार्गावर चालायचं असतं
यशस्वी होऊनी परत सतत प्रयत्नरत रहायचं असतं
कारण, प्रयत्नातूनचं सर्व काही मिळवायचं असतं
आणि त्याच पराकाष्ठेमुळे कठीण असं काही नसतं..!
✍️ खुशी ढोके