कधीतरी कंटाळा येतो......🥴
हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
काय मग सगळं बंद
जगणं होतं मंद...
हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
माणूस आहे मी
मग राग तर येईलच की...
हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
त्या बडबडीचा
नको ती हडबडीचा....
हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
कोणाकडून सततची स्तुती
आपल्याविरोधी इतरांची युती...
हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
इतरांना खुश करणे
त्यांच्यापुढे कारण नसता हरणे...
हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
नेहमी ठरवून आपल्यालाच चूक
इतरांच्या चुकांवर आपलंही राहूनी मूक...
हो येतो ना
कधी तरी कंटाळा!
करून अभ्यासपूर्ण वार
योग्य मुद्द्यांसाठी होती हद्दपार...
हो येतो ना
नेहमीच येतो कंटाळा!
कोणी नाहीच आपलं हे माहीत आहे म्हणणारे
दोन शब्द चांगले ऐकून सर्वस्व बहाल करणारे...
ह्या आणि अशा वागणुकीचा येतो मज कंटाळा!
📌 खुशी ढोके