रखरखत्या रस्त्या वरील सावली तु
एकट्या माझ्या प्रवासाचा साथीदार तु
अबोल माझ्या मनाचे शब्द ही तू
कठीण प्रसंगी लागणारी हिम्मत माझी तू 🤗
धडधडत्या हृदयाची अनिश्चित गती हि तुच
सकाळ च्या कोवळ्या त्या कीरणात हि तूच
ज्याच्या सोबत फेर धरून नाचवेसे वाटे तो तु
ज्याच्या सोबत दुःखाची झळ हि हवीहवीशी वाटे तो हि फक्त तूच 🤗🤗
माझ्या कपाळावरील कुंकवाचा धनी तु
हातात खनखननाऱ्या हिरव्या चुड्याची चमक तु
पायातील पैंजणाचा छुमछुमनाऱ्या संगीतात तू
चेहऱ्यावरच्या या गुलाबी लाली चे कारण हि तूच ☺️☺️
माझ्या मनाचा हकदार तु
माझ्या सोबतीचा जोडीदार तु
माझा मितवा ही फक्त तुच
माझा मितवा ही फक्त तुच ☺️🤗🙈🤗☺️
-वैशाली बनकर❤