कातरवेळ 🍃
या कातरवेळी सख्या ये तू जवळी
अधीर मनाला जणू तुझीच आस लागली
बघ दिवस सरता सरेना, सूर्य ही बुडेना
रात्र जणू पेंगाळतेय अन् चंद्र ही काही दिसेना
दिवस-रात्रीच्या कात्रीत अशी कशी मी अडकली
अशा या अधांतरी मनाला हुरहूर तुझीच लागली
तुझ्या परतीची आपसूक चाहूल मनाला झाली
मग तुला पाहण्यासाठी ही वेडी व्याकुळ झाली
ह्या क्षणी केवळ तुझाच विचार मनी
डोळे दूरवर लावूनी वाट पाहे तुझी सखी...
वाट पाहे तुझी सखी....
- प्रियांका कुंभार
23/02/2021
(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )