पण मुद्दा मुळात तो नाही..
जायचं होतं पण गेलो नाही..
बोलायचं होतं पण बोललोच नाही..
तुम्ही म्हणाल भित्रा मला
पण मुद्दा मुळात तो नाही..
शक्ती प्रदर्शनाशिवाय,
बाकी त्यात नव्हतंच काही..!!
लिहायचं होतं पण लिहलं नाही..
खोडायचं होतं पण खोडलं नाही..
तुम्ही म्हणाल निरक्षर मला
पण मुद्दा मुळात तो नाही..
एकांगी विपर्यासाशिवाय,
बाकी त्यात नव्हतंच काही..!!
काही करायचं होतं पण केलं नाही..
स्वस्थ बसायचं होतं पण तेही जमलं नाही..
तुम्ही समजाल तटस्थ मला
पण मुद्दा मुळात तो नाही..
निव्वळ स्वार्थाशिवाय,
बाकी त्यात नव्हतंच काही..!!
शेवटी फिरून मुद्दे तिथेच येतात
कुठे दिशाहीन भटकत राहतात
आपलं कोण परकं कोण?
काही काही कळत नाही..
आणि आपल्या विचारांशी सहमत
आपल्या शिवाय कोणीच नाही..!!
--सुनिल पवार...✍🏼
https://www.facebook.com/274730592665311/posts/1849570045181350/