Marathi Quote in Poem by S. P.

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

|| निसर्ग ज्ञानझरा ||
============
जेथे जातो तेथे
गुरु मज दिसतो..
निसर्ग बनते शाळा
मी विद्यार्थी होतो..!!

गाय हंबरे वात्सल्ये
वासरु घेते धाव..
ममतेच्या सूत्राचा
तेथे लागे ठाव..!!

किलबिलती पाखरे
शीळ घाली वारा..
संगीतज्ञान अमोघ
देतो वाहता झरा..!!

घट्ट बिलगून वेली
आधारास राहती..
दृढ विश्वासाची शिकवण
तरुवर देती..!!

फुलपाखरे बागडती
फुलांफुलांवरून..
आनंदाचा उगम स्तोत्र
गंधळतो त्यातुन..!!

नदी दौडते आवेगे
होते सागरी विलीन..
प्रेम समर्पणाचा भाव
तेथे होतो लिन..!!

न आटणार कधीही
निसर्ग ज्ञानझरा..
लाभे समृद्धी तयाने
.कास त्याची धरा.!!
--सुनिल पवार...✍🏼
https://www.facebook.com/274730592665311/posts/1843293109142377/

Marathi Poem by S. P. : 111561631
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now