बराच वेळ तो समोरच्या टेबलावर एकट्याच बडबडत बसलेल्या इसमाकडे पाहत होता.
"सर, हा ग्लास कुणासाठी? आणि तुम्ही नेहमी फक्त त्याच्याशीच बोलता..."
"मित्रा, हा ग्लास आहे त्या माझ्या सर्व जिवाभावाच्या मित्रांसाठी, ज्यांनी मला आजपर्यंत साथ दिली आणि ज्यांची साथ आयुष्यभर असणार आहे."
"सर, मग ग्लास अर्धाच का?"
"मित्रांशिवाय आपलं जीवन अर्धच असतं, अपूर्ण असतं."
त्यासाठी मित्रांना जपा. महिन्यातून एखाद दुसरा कॉल करत जा. मन मोकळं बोलत जा.
#अर्धा