प्रेम
चाहूल प्रेमाची मनी देऊन गेलास
त्सुनामी परी मन हलवून गेलास
फुलबागेची होते मी फुलरानी
चिरेबंद पुस्तकात कोंबून गेलास
हळव्या,स्थिर मनात माझ्या
शाब्दिक वादळ उठवून गेलास
टिमटिमर्या काजवी भावनांना
आकाशी विलीन करुन गेलास
भाव माझ्या मनीचे किती अबोल होते
त्या मनाला हुररहुरीचा शाप देऊन गेलास
कु.प्राजक्ता