तुझं माझं नातं नेहमी असच राहावं
दररोज नव्याने तुझ्या प्रेमात पडावं
चुकलं जरी थोडस समजून घ्यावं
असच नेहमी आपण प्रेम करत राहावं
तुझ्या सोबत बसून प्रेमानं बोलावं
कधी न बोलताच मनातलं ओळखावं
भांडण थोडंस नंतर जीवापाड प्रेम
सोबतीन घालवावा आयुष्याचा प्रत्येक क्षण
कधी स्वप्नात येऊन तुला थोडंस सतवावं
कधी प्रेमात तुझ्या वेडं होऊन जावं
आठवणींच्या प्रत्येक कप्प्यात तू असावं
आठवणीन मध्ये तुझ्या अखंड बुडून जावं
स्मरण एकमेकांचं आपल्याला नेहमी असावं
हे सुंदर नातं आपण आयुष्यभर जपावं
#Enjoy