लहानपणीची नाजूक पाऊले
आज उंबरठ्या बाहेर चालली
बापाचा हात धरणारया बोटांनी
आयुष्याची दोरी धरली
भातुकलीच्या खेळातील नवरी
आज बोहल्यावर चढली
दूरुन तिला बघून
ऊर भरून आला
हसून तिला आशिर्वाद देताना
आतून बाप भरभरून रडला
मायेने जपलेली कळी
आज परकी झाली
अश्रू भरल्या डोळ्यांनी ती
सासरी चालली
हसून तिला पाठवण्याची कला
फक्त बापालाच जमली
कला