परिवर्तन प्रतिष्ठान शिक्रापूर ता शिरूर जि पुणे कडून तुम्हा सर्वांना कळकळीचे आवाहन...
#कोरोना आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्याला घरात घेऊन येऊ नका.
खालील नियमांचे काटेकोर पणे पालन करा..
1. हात स्वच्छ पाण्याने कमीत कमी 20 सेकंद व्यवस्थित पणे धुवा.
2. विनाकारण हाताने तोंडाला, नाकाला आणि डोळ्याला स्पर्श करू नका.
3. सर्दी, ताप, कोरडा खोकला, हगवण, डोके दुःखी अशी लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. घरगुती उपचार टाळावेत.
4. वरील लक्षणे दिसत असतील तर इतर लोकांपासून दूर राहा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अशा वेळी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधा.
5. इतर व्यक्तीशी बोलताना किंवा कसलाही व्यवहार करताना कमीतकमी3 फुटांचे अंतर ठेवा.
6. हस्तांदोलन न करता नमस्कारावर भर द्या.
7. गावचे ग्रामदैवत, गावाची चावडी, गावाचा पार तसेच इतर मंदिरे या ठिकाणी उगाच गर्दी करू नका. गर्दी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
8. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची खरेदी करण्याव्यतिरिक इतर कारणांसाठी घराबाहेर पडू नका.
9. तरुणांसाठी: कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी तसेच पंतप्रधान सहायता निधी मध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान द्या.
10. वैद्यकीय गरज निर्माण झाली तर ग्रामपंचायत तसेच इतर वैद्यकीय अधिकारी (सरपंच, ग्रा. प. सदस्य, ग्रामसेवक) यांच्याशी संपर्क साधावा.
12. वरील सर्व सूचनांचे पालन करून देशावर आलेल्या या संकटाला हरवण्यासाठी एकजूट व्हा.
#waragaistcorona