#असुर #Asur
सध्या वूट अँप वर प्रिमियम सेक्शन मध्ये बरीच चर्चीत आणि मनाला खिळवून ठेवणारी ही वेब सिरीज तुम्ही सर्वांनी पाहिलीच पाहिजे. सध्याच्या लॉकडाऊन मध्ये आयुष्य एकदम नीरस होऊन गेल्यासारखे वाटत असेल तर थ्रिल आणण्यासाठी आवर्जून ही वेब सिरीज बघा!
डोक्याला मुंग्या लागतील अश्या मर्डर मिस्ट्री आजवर नाही पाहिल्या! जिथे जिथे आपणं प्रेडीक्त करू तिथे तिथे गुंता अजूनच वाढत राहतो. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात देखील आपण नक्की सुरक्षित आहोत का?
मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मातीच्या गोळ्याला घडवणे! मुलांच्या मनावर आपण जे बिंबवतो मुले पुढे जाऊन अगदी तशीच घडतात याचे अचूक दिग्दर्शन जमले आहे.
एकंदरीत माझ्या मते मी या वेब सिरीज ला दहा पैकी दहा देखील देऊ शकते पण, कुठेतरी मार्क काटला पाहिजे म्हणून मी या सिरीज ला नऊ गुण देत आहे!
वाट कसली पाहत आहात, आजच पहा...असुर !
#प्रिया सातपुते #Prreeyasatputeh