Marathi Quote in Blog by मच्छिंद्र माळी

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

###Good night!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

*श्री संत सेना महाराज**पुण्यतिथी*
----------------------------------------------

आज श्रावण वद्य द्वादशी संत सेना महाराज पुण्यतिथी.

वैशाख वद्य द्वादशी रविवार विक्रम सवंत १३५७ यादिवशी देवीदास व प्रेमकुवंरबाई या मातापित्याना पुत्र रत्न झाले बाधंवगङ येथे तेच सेना महाराज,त्यांचे वडील हे श्री ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांचे गुरुबंधु होते.
श्री रामानंदस्वामी हे त्यांच्या गुरुंचे नाव होते.
बालपणापासून सेना यांना परमेश्वरभक्तीची आवड होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना नाभिक व्यवसाय शिकवला होता.तो व्यवसाय करीतच ते पांडुरंगाचे भजन-किर्तन करीत.साधुसंत हे
नेहमी सेना यांच्या घरी येत असत.त्या संताची ते सेवा करीत.वडिलांप्रमाणे त्यांनीही रामानंदस्वामी यांचे शिष्यत्व पत्करले.सेना यांची भक्ति,आचरण,ज्ञान पाहून
रामानंदस्वामी यांनी त्यांना सामाजिक समत भक्तिमार्गात आणण्याचे कार्य करण्यास सांगितले.गुरुआज्ञाने त्यांनी ती महत्वाची कामगिरी केली.

लोकांची दाढी-डोई करण्यात ते प्रवीण
होते.त्यांच्या हाताला मृदुमुलायम स्पर्श होता.त्यामुळे शरीराचा दाह कमी होते असे.लोक सेना यांच्याकडे हजामत करवून घेण्यासाठी येत होते,तसेच त्यांच्या भजन-किर्तनालाही गर्दि करीत होते.सेना यांची किर्ती बादशहाच्या कानी गेली.त्याने सेना यांना बोलावून घेतले व आपल्याकडे नोकरीला ठेवले.

एकदा सेना महाराज हे पांडुरंगाची पुजा करीत बसले होते.बादशहाकडून तीन-चार बोलावणी आली."ते घरात नाहीत,"असेच प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नीने सांगितले. परंतु त्यांच्या दुष्ट शेजाऱ्याने लगेच जाऊन बादशहाला कळविले की,"सेना न्हावी घरात देवपूजा करीत बसला आहे.त्याच्या बायकोनं तो घरात नसल्याचं खोटं सांगितल."ते एकून बादशहास क्रोध आला.सेनानी त्याने मोट बांधून त्याला नदिच्या उसळ्त्या प्रवाहात टाकून देण्याची सेवकांना आज्ञा केली.तेव्हा पांडुरंग सेना न्हावी यांचे रुप घेऊन बादशहासमोर गेला.त्याला पाहताच
बादशहाचा राग शांत झाला व तो हजामत करण्यास बसला.हजामत करीत असताना बादशहा मान खाली करी त्या वेळी रत्नखचित
वाटीतील तेलात बादशहाला पांडूरंगाचे प्रतिबिंब दिसे,वर पाहिले की,समोर सेना न्हावी दिसू लागे.वाटीतील ते रुप पाहून
बाद्शहा अगदी मोहित झाला.त्याचे देहभान हरपले. हजामत झाल्यावर बादशहाने त्याला ओंजळभर सोन दिले. पांडुरंगाने ते धोकटीत
ठेवून,ती धोकटी सेना न्हावी यांच्या घरी नेऊन
ठेवली,आणि आपण गुप्त झाले.

बादशहाला ते ईश्वरी स्वरुप पाहण्याची ऒढ
लागली.दोन प्रहरी त्याने सेना न्हावी यांना बोलावून घेतले. त्याला पाहताच त्याने
ती सकाळची वाटी आणविली. म्हणाला,
"सकाळी मला या वाटीत ते चतुर्भुज रुप दिसत होते,ते मला पुन्हा दाखव".बादशहाचे हे उदगार ऎकून सेना विस्मित झाले.
प्रात:काली बादशहाला जे रुप दिसले तसे पुन: दोन प्रहरी दिसेना.तेव्हा आपल्या रुपाने पांडुरंग आला असाव असे समजून त्याने पांडुरंगाचा धावा केला.तेव्हा बादशहाला पुन:ते रुप दिसले.नंतर सेना यांना आपल्या धोकटीत धन दिसले.ह्या चमत्कारामुळे
बादशहा विरक्त होऊन श्रीहरीचे भजन करु लागला.सेना महाराजाना आनंद झाला.
सेना महाराज यांनी मध्य भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले; नंतर त्यांनी पंढरपुरात वास्तव्य केले.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तीरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामा इतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ अधिकारी मानले जाते.संत सेना महाराजांचे अभंग
मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश,भाषा,जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.
अतीशय उच्च विचार सरनी व पंढरीनाथावर निष्टा असनारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात अशी त्याची जिवन यात्रा अखेर पर्यंत चालु राहीली बर्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले जिथ जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनरवैभव प्राप्त झाले .
दिवसभर घरातच चितंनात मग्न राहीले दुसरा दिवस उजाडला कुनाशीही न बोलता धोकटी खुटीला अङकवून तिथच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले.
तो दिवस श्रावण वद्य द्वादशी सेनामहाराज पुण्यतिथी दिन.

--------------------------

? ? ?

Marathi Blog by मच्छिंद्र माळी : 111244297
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now