"श्रीसूक्त"
"ऋचा ५"
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् | तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ||५||
अर्थ:--चंद्राम:-चंद्राप्रमाणे आल्हाददायक असणाऱ्या व प्रभासम म्हणजे अत्यंत कांतीमती आशा.
यशासा ज्वलंतीम म्हणजे दिक्कालाल
भेदून जाणाऱ्या यशामुळे जी त्रैलोक्यात
प्रसिद्ध आहे अशा,आणि देवजुष्टाम:-इंद्रप्रमुखादी देवांनी जिचा आश्रय केला आहे,इंद्रादी देव जिची सेवा करतात आशा,उदाराम:-अन्तर्बाह्य उदार असणाऱ्या, मनाने प्रगल्भ आणि आकृतीने लावण्यती असणाऱ्या, पद्मिनीम,म्हणजे कामलाकार असणाऱ्या,ताम-श्रीयम-आशा या लक्ष्मीला मी विनम्रभावाने शरण,प्रपद्ये:-
आलो.शरण भावाने तिच्या जवळ आलो, हा आशय.त्या अर्थी मे-माझी
अलक्ष्मी-भौतिक दारिद्रय, आणि मानिसिकही,नश्यताम -नाशाप्रत जाऊदे
त्वाम-वृणे--मी तुला सदैव शरणभावणे
जवळ केले आहे.
सर्वव्यापीनी लक्ष्मीचे स्वरूप या मंत्रात आले आहे."देवजुष्टाम"हे विशेषण अर्थपूर्ण आहे-देवांनी स्वीकारली जावी
अशी संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती.या दैवी
संपत्तीमुळेच वनवासी पांडवांना साक्षात
भगवंताचा पाठिंबा मिळाला.अशी ही
दैवी गुणांची संपत्ती आपल्यामध्ये यावी,
म्हणून या मंत्रात प्रार्थना केली आहे.