Marathi Quote in Blog by मच्छिंद्र माळी

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

केदारनाथ मंदिर - न उलगडलेल कोडं
संकलनः मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

केदारनाथ मंदीराच निर्माण कोणी केल ह्या बाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवान पासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण मला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर साधारण ८ व्या शतकात बांधल गेल असाव अस आजच विज्ञान सांगते. म्हणजे नाही म्हंटल तरी हे मंदिर कमीत कमी १२०० वर्ष अस्तित्वात आहे. केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा २१ व्या शतकात हि आहे. एका बाजूला २२,००० फुट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फुट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अश्या तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. ह्या क्षेत्रात मंदाकिनी नदी च राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अश्या प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती प्रचंड अभ्यास केला गेला असेल.
२०१३ साल केदारनाथ इकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे सरासरी पेक्षा ३७५% जास्त पाउस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल ५७४८ लोकांचा जीव गेला. ४२०० गावाचं नुकसान झाल. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्ती लोकांना भारतीय वायू सेनेने एअर लिफ्ट केल. सगळाच्या सगळ वाहून गेल. पण ह्या प्रचंड अश्या प्रलयात केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला थोडा धक्का पण लागला नाही.

२०१३ साल केदारनाथ इकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच.ह्या काळात इकडे सरासरी पेक्षा ३७५%जास्त पाउस झाला.त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल ५७४८लोकांचा जीव गेला.४२००गावाचं नुकसान झाल.तब्बल१लाख १०हजार पेक्षा जास्ती लोकांना भारतीय वायू सेनेने एअर लिफ्ट केल.सगळाच्या सगळ वाहून गेल.पण ह्या प्रचंड अश्या प्रलयात केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला थोडा धक्का पण लागला नाही.
अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया च्या मते ह्या प्रलयानंतर सुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चर च ऑडीट मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. आय.आय. टी. मद्रास ने मंदिरावर एन.डी.टी. टेस्टिंग करून बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झाल आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे. दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात?
हे मंदिर उभारताना उत्तरदक्षिण अस बांधल गेल आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिर हि पूर्व – पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधल गेल आहे. ह्यातील जाणकारांच्या मते जर मंदिर पूर्व- पश्चिम अस असत. तर आधीच नष्ट झाल असत. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच. पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचल आहे.दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे.त्यामुळेच वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रोपर्टीज मध्ये फरक झालेला नाही.त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात गोवले आहेत.त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंट वर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे.२०१३ च्या वेळी एक मोठा दगड पाठीमागच्या घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार हि विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सगळ काही आपल्यासोबत वाहून नेल पण मंदिर आणि मंदिरात शरण घेतलेले लोक सुरक्षित राहिले.ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायू दलाने एअर लिफ्ट केल होत.



?? ??????????

?? *ॐ नमः शिवाय* ??

Marathi Blog by मच्छिंद्र माळी : 111177850
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now