Kavyotsav 2.0
देव म्हणतो " मी येथे आहे "
मी लहान बाळांच्या हसण्यात आहे
सर्व प्राण्यांच्या श्वासात आहे,
जगातील सर्व वस्तूत आहे,
चराचरात माझे अस्तित्व आहे
देव म्हणतो " मी येथे आहे "...(१)
मी शरीराच्या स्वच्छतेत आहे
मनाच्या स्वच्छतेत आहे,
घरातील स्वच्छतेत आहे
आणि देशाच्या स्वच्छतेत आहे
देव म्हणतो " मी येथे आहे "...(२)
मी सौंदर्यात आहे
कुरूपात आहे
पण सद्विचारात आहे
आणि सद्व्र्त्तीतही आहे
देव म्हणतो " मी येथे आहे "...(३)
मी सत्यवचनात आहे
परोपकारात आहे
निस्वार्थ सेवेत आहे
निर्मळ प्रेमात आहे
देव म्हणतो " मी येथे आहे "...(४)
मी सद्बुद्धीत आहे
त्या बुद्धीचा शक्तीत आहे
ज्ञानात आहे आणि
विज्ञानातही आहे
देव म्हणतो " मी येथे आहे "...(५)
मी जमिनीत आहे
जमिनीतली धान्यात आहे
धान्यातिल शक्तीत आहे
शक्ती वापरणाऱ्या माणूसातही मी आहे
देव म्हणतो " मी येथे आहे "...(६)
कानाची शक्ती मी आहे
जीभेचा शक्ती मी आहे
मनातली शक्तीही मीच आहे
सर्व प्रकार चे शक्तीत माझे वास्तव्य आहे
देव म्हणतो " मी येथे आहे "...(७)