दैवत्व
कै. हनुमंत अण्णा
आज तुम्ही आमच्यात नाहीत
तुमच्या कर्तुत्वातुन अन् दातृत्वातून
वाघळवाडी परिसरात ग्रामविकास संघटना, समर्थ ज्ञानपीठ, सह्याद्री पब्लिक स्कुल,उत्कर्ष आश्रम शाळा, डेअरी डिप्लोमा कॉलेज तसेच पुरंदर पब्लिक स्कुल,जेजुरी व सह्याद्रि पब्लिक स्कुल, लोणंद आपल्या दिमाखात आज उभी आहेत. फक्त हा शिक्षणाचा महामेरु कल्पवृक्ष उभाय तो तुमच्याच प्रयत्नातुन...........
आभाळाची छाया,
तुझी समुद्राची माया
"परिसानं नेहमीच नेहमी दुस-यालाच सोनं केलंय,
त्यानं स्वता: चा कधीच विचार केला नाही,
तुमच्याच कर्तृत्त्वानंच आज आमचं अस्तित्व आहे
प्रवाहात नसतानाही
प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन,
स्वत:च एक वेगळी छाप पाडणं
ठसा उमटवणंं हे कुणाचंही काम नाही
शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची किमया
इतकी सहज सोपी नाही
खरंच तुम्ही किमयागार आहात अण्णा .........
प्रत्येकजण जीवनामध्ये
काही-न काही कमवत असतो
पण माणसं कमावणं ती आपलीशी करणं हे कसब फक्त तुम्हालाच ठाऊक
तुमच्यासारखा असणं हे माझं भाग्य आहे
प्रसंगी मृदुभाषी तर कधी कठोर
बनुन ज्याच्या-त्याच्या आयुष्यात
तुम्ही आलात तुमच्या परिस्पर्षानं
आमच्या जीवनाचं सोनं झालं
आयुष्यात तुमच्यासारखी देवमाणसं भेटणं
हा शेवटी नशीबाचा भाग आहे
तुमचं ऋण काही केल्या फेडलेच
जाऊ शकत नाही.......!!!!
झीजलास तू रे
सांग असा कैसा?
परिमळ वाहे
चंदन जैसा
देई दरवळ,सुगंध
तू कस्तुरीमृग एैसा
उपकार परोपकार
एैसीे जाणे भाषा
एैसी आभाळाची माया
बने लोखंडाचे सोने
परीसाची किमया
तैसे काम तुझे
दीन दलितांशी
बांधुनीया नाळ
रितभात पुसलीशी
जपुनिया मातीशी इमान
वाल्याचा बनवीला वाल्मिकी
केला तुम्ही माणुस तैसा सैतानाचा
ना पाहीली एैसी मुर्ती राऊळी मंदिरी
बनलास तू रे देवा सांग एैसा कैसा
माया ममता नातीगोती
आप्त स्वकीयांनी फिरवली पाठ
आम्हावरी तुझी कृपासावली
तुची विठु माऊली आमची ओळख
तुमचा वारसा
घेतलेला वसा
आम्ही पुर्ण जबाबदारीने पुढे चालवु .....
ग्रामविकास घडवु नवयुग निर्माण करु
© म.वि
©sanjweli