हे रंग जीवनाचे
जणू भासे मज इंद्रधनुचे
कितीतरी छटांनी भरलेले
सुखदुःखाचा रंग उधळणारे ||1||
हे रंग जीवनातील स्पर्धेचे
परस्परांशी लढायला लावणारे
ना जिंकल्याचा आनंद
ना हरल्याचे दुःख ||2||
हे रंग जीवनातील प्रेमाचे
प्रियसीला रोज गुलाब देण्याचे
तिने हसत हसत स्वीकारण्याचे
मी मात्र झुरून मरण्याचे ||3||
जीवन म्हणजे रंगांचे मिश्रण
आयुष्यभर उधळत बसण्याचे
आनंदाने आलेले क्षण उपभोगण्याचे
कुरकुर न करता व्यतीत करण्याचे ||4||
प्रदीप जोशी विटे

Marathi Poem by Pradip gajanan joshi : 111164275
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now