हे तरुण मुले आणि मुलीनो
हे तरुण मुले आणि मुलीनो
इकडे लक्ष द्या क्रपा करून
मी काय सांगतो
नीट ऐका मनापासून...(१)
आपल्या मिळालेल्या
हा नर जन्म
८४ लाख योनीतला
एक आहे सर्व श्रेष्ठ,
वाया नका घालू हा जन्म
साधून घ्या तुमचा उद्दिष्ट...(२)
तुम्ही आहे देशाचे
भावी सुसंस्कृत नागरिक,
बनवा तुमचे चारित्र्य
अती महान आणि पवित्र...(३)
बालपणा चे ५ वर्ष
घालविला खेळण्यात
मिळविला मनसोक्त हर्ष
तरीही विसरू नका,
सर्व काही शिकून घेण्यात...(४)
वयाच्या २५ वर्षा पर्यंत
घ्या परिपूर्ण उत्तम शिक्षण,
निवडा आवडीचे करिअर
आणि
चढत जा बढतीचे मंदिर...(५)
५० वर्षापर्यंत
करा उत्कृष्ट संसार
व्हा आदर्श पती, पत्नी
उत्तम आई,वडील बनून
बनवा सुसंस्कृत नागरिक
तुमचे मुल,मुलीना...(६)
खेळू नका कुठेही राजकारण
आणू नका कधीही खोटेपणा,
प्रामाणिकपणे ने काम करा
देवाला मात्र विसरू नका...(७)