एक सुंदर प्रार्थना प्रत्येकाने देवाला दररोज करावी अशी...
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*? एक सुरेख प्रार्थना ?*
*गळ्यामधे माळ दे, हाता मध्ये टाळ दे।*
*देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे॥*
*संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे।*
*तुझे गीत गाता यावे असे वरदान दे॥*
*मायेसाठी माय दे, वारी साठी पाय दे।*
*तुझी कृपा कामधेनू, अशी एक गाय दे॥*
*दिवस भर काम दे, पोटापुरता दाम दे।*
*चिंता दूर करावया ओठी तुझे नाम दे॥*
*कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे।*
*खांधावर देवा, तुझ्या पालखीचा भार दे॥*
*ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे।*
*श्रावणाच्या सेवेपरी थोडसं ईमान दे॥*
*तुकोबाची वीणा दे, ज्ञानियाची करुणा दे।*
*मूर्त डोळा, पायी माथा ठेवुनीया मरणा दे॥*
*मागू किती राहू दे, सारे एके ठायी शोभु दे।*
*वाट दाखवण्या गुरू, जन्मो जन्मी लाभू दे॥*
*??? श्री गुरुदेव ???*