निळसर रंगाच्या दुलईत लपला
अजून झोप सरली नाही
पहाटेने हाक देऊनही
जाग त्याला आलीच नाही!
कोंबड्यांचा आरव
पक्ष्यांचे कूजन
त्याच्याच कुशीतल्या
मधमाश्यांचं गुंजन
उगवतीचा सूर्य माध्यावर आला
अंगावरच्या कणखर घड्यांनी आळस दिला
थकलो आहे आता ऊन पाऊस झेलून
श्रांतावंसं वाटतं आता दिगंताकडे पाहून..