*संतवाणी*
*होउनि विठोबाचा दास। करी आस दुजियाची॥*
*वायां माता व्याली तया । भूभार कासया अवनीसी॥*
*पूर्वज तया कंटाळती। जन्मला खर हा ॥*
*एकाजनार्दनीं म्हणे। तया पेणें यमलोकीं॥*
संत एकनाथ म्हणतात, वरकरणी भक्ती करून उपयोगाचं नाहीं. भक्ती करायची म्हटली की प्रपंचाची आसक्ती सोडायला हवी. प्रपंचातील उपभोगांची व सुखांची लालसा व आशा सोडायला हवी; त्याविषयीची एकप्रकारची आलिप्ततेची भावना मनात रूजवायला हवी; एका अर्थानं, पूर्णतया आपण ‘देवाचे दास’ व्हायला हवं व निष्ठेनं त्याची भक्ती करायला हवी. असं केल्यानंच आप