अंगणी माझ्या आभाळ सांडले, ढगांची घालमेल मनामध्ये.

पिसाटला वारा रोमारोमांतुनी, फडफड रव्याची रानामध्ये.

झरते नाभाळ नीर क्षण थेंबातुन, ओलावते माती श्वासातून.

अलवार विसावले जलमोती पानावर,ओठ कळ्यांचे मिटलेले.

खळखळ ओढ्याची अवखळ झऱ्याची,वाटही मनाची नागमोडी.

रेखीव कुंचला रंगीत इंद्रधनूचा, झिम्माड पाऊस डोळियात.

नाचरा मोर फुलावी पिसार, आठवांच्या धारा गाण्यामध्ये.

आषाढ सारी श्रावण धारा,येई मुराळी माहेराचा.

अंगणी माझ्या सडा प्राजक्ताचा, प्रेमाचा सोहळा पावसाचा.

           पल्लवी लक्ष्मीकांत काटेकर. कोल्हापूर

, फोन -९८८१२२७९८९

Marathi Poem by pallavi katekar : 111224396

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now