भाग १: वेढ्यातून सुटका या ऐतिहासिक कथेत शिवाजी महाराज आणि त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पन्हाळागडावर आदिलशाहीच्या फौजांनी चार महिने वेढा घातलेला आहे. पावसाळा सुरु झाल्याने परिस्थिती आणखी कठीण झाली आहे, तरीही आदिलशाहीच्या सैनिकांनी मागे हटण्यास नकार दिला आहे. नेताजी पालकर आणि त्यांच्या सैनिकांनी वेढा फोडण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु यश मिळाले नाही. सिद्दी जौहर शिवाजी महाराजांना पकडण्याच्या हेतूने ठाम आहे आणि तहाच्या बोलणीत सहभागी होण्यासाठी तयार नाही. स्वराज्यावर मुघलांच्या उघडलेल्या मोहिमेने राजांना चिंतित केले आहे. राजांनी जौहरला शरण जात असल्याचे कळवले असून, यामुळे जौहरची फौज निष्क्रिय झाली आहे. गुप्तहेर नवीन माहिती आणत आहेत, ज्यामुळे गडाच्या सुटकेची योजना आखली जात आहे.
वेढ्यातून सुटका - भाग-१
by Ishwar Trimbak Agam
in
Marathi Fiction Stories
29.6k Downloads
41k Views
Description
भाग १ : वेढ्यातून सुटका (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) धो-धो बरसणारा पाऊस अन घोंघावणारा वारा आपल्याच तालात झाडाझुडपांना नाचवत होता. विजांचा कडकडाट अन ढगांच्या गडगडाटांसह बरसणाऱ्या शंभूरूपी निसर्गाने रौद्र रूप धारण करून जणू तांडवनृत्यच चालवले होते. डोंगर दऱ्यांतून अन कड्या-कपारीतून खळखळ वाहणारे पाणी पांढऱ्याशुभ्र दुधाप्रमाणे भासत होते. सकाळचा प्रहर अन मध्यरात्रीचा काही घटकांचा वेळ सोडला तर पावसाची रिपरिप अखंड चालू होती. गडावरून वेगाने वाहत येणारे पाणी आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त
More Interesting Options
- Marathi Short Stories
- Marathi Spiritual Stories
- Marathi Fiction Stories
- Marathi Motivational Stories
- Marathi Classic Stories
- Marathi Children Stories
- Marathi Comedy stories
- Marathi Magazine
- Marathi Poems
- Marathi Travel stories
- Marathi Women Focused
- Marathi Drama
- Marathi Love Stories
- Marathi Detective stories
- Marathi Moral Stories
- Marathi Adventure Stories
- Marathi Human Science
- Marathi Philosophy
- Marathi Health
- Marathi Biography
- Marathi Cooking Recipe
- Marathi Letter
- Marathi Horror Stories
- Marathi Film Reviews
- Marathi Mythological Stories
- Marathi Book Reviews
- Marathi Thriller
- Marathi Science-Fiction
- Marathi Business
- Marathi Sports
- Marathi Animals
- Marathi Astrology
- Marathi Science
- Marathi Anything
- Marathi Crime Stories