कथा एक काळाची आहे जिथे मोठे यज्ञ होत होते, जे बाराबारा वर्षे चालत असत. यज्ञप्रसंग उत्सवासमान असत आणि अनेक लोक एकत्र येत. एक दिवस देवांनी ठरवले की एक मोठा यज्ञ करायचा आहे, ज्यात देव, दानव, आणि मानव सर्व एकत्र येणार होते. देवांनी सर्वांना आणण्यासाठी विमाने पाठवली, ज्यामुळे सारे स्वर्गात पोहचले. यज्ञात स्वर्गातील गाईंचे तूप अग्निनारायणाला अर्पण केले जात होते. एक लहान मुलगा त्याच्या आईकडे विचारतो की तूप का जाळतात आणि ते त्यांना का दिले जात नाही. आई त्याला सांगते की ते देवाला द्यायचे आहे. मुलगा नाखूष होतो कारण तो उपाशी आहे आणि देवाला तूप देऊन त्याला काही मिळणार नाही. कथा हसण्यासारखी आहे, जिथे देवाच्या पूजा आणि दानाची परंपरा आणि मानवांच्या इच्छांचा संघर्ष आहे.
सुंदर कथा - 3
by Sane Guruji
in
Marathi Moral Stories
3.6k Downloads
9.9k Views
Description
फार दिवसांपूर्वीची गोष्ट. त्या काळात मोठमोठे यज्ञ होत असत. बाराबारा वर्षेही चालत. यज्ञप्रसंग म्हणजे उत्सवाचे. जणू जत्राच तेथे भरे. हजारो लोक यायचे-जायचे. परस्परांस भेटायचे. तेथे बसलेल्या दुकानांतून माल न्यायचे. तेथे होणाऱ्या कथाकीर्तनांतून, पुराणप्रवचनांतून धर्म शिकायचे. तेथे खेळ असत, कुस्त्या असत. नवीन नवीन नाटके व्हायची व चांगली ठरतील त्यांना बक्षिसे मिळावयाची. अशी त्या काळातील गंमत. एकदा देवांच्या मनात आले की, कधी झाला नाही एवढा मोठा यज्ञ करावयाचा. त्यांनी दानवांना विचारलं की, याल का यज्ञाला? दानव हो म्हणाले. मानवांनाही निरोप आला. मानवांनीही जायचे ठरविले. देव, दानव, मानव सारे एकत्र जमणार? कधी झाली नव्हती अशी गोष्ट होणार होती.
More Likes This
More Interesting Options
- Marathi Short Stories
- Marathi Spiritual Stories
- Marathi Fiction Stories
- Marathi Motivational Stories
- Marathi Classic Stories
- Marathi Children Stories
- Marathi Comedy stories
- Marathi Magazine
- Marathi Poems
- Marathi Travel stories
- Marathi Women Focused
- Marathi Drama
- Marathi Love Stories
- Marathi Detective stories
- Marathi Moral Stories
- Marathi Adventure Stories
- Marathi Human Science
- Marathi Philosophy
- Marathi Health
- Marathi Biography
- Marathi Cooking Recipe
- Marathi Letter
- Marathi Horror Stories
- Marathi Film Reviews
- Marathi Mythological Stories
- Marathi Book Reviews
- Marathi Thriller
- Marathi Science-Fiction
- Marathi Business
- Marathi Sports
- Marathi Animals
- Marathi Astrology
- Marathi Science
- Marathi Anything
- Marathi Crime Stories