लाल महाल आणि शाहिस्तेखान

(21)
  • 27k
  • 3
  • 9k

स्वराज्यावर राहू केतू चालून आले होते ...त्यातला सिद्दी जौहरला राजांनी पन्हाळा गडाखाली ४ महिने झुलत ठेवले होते आणि संधी मिळताच...त्याच्या पोलादी वेढयातून राजे सुखरूप निसटले होते..पण शिवा काशीद, बाजीप्रभू आणि फुलाजी देशपांडे अशी नररत्ने कामी आली होती.. पुन्हा ताज्या दमाच्या विशाळगडाला चार पाच महिने वेढा घालण्याची ताकत आता सिद्दी जौहर मध्ये नव्हती आणि वेढा घातलाच तरी..राजे पुन्हा पळून गेले असते तर काय.. सिद्दी जौहरचा आत पुरता बिमोड झाला होता.. पण राहू गेला तरी अजून केतू आपला विषारी वेढा घालून लाल महालात गेली तीन वर्षे बसला होता..आणि त्याच्या बरोबर होते जवळ जवळ एक लाख

Full Novel

1

लाल महाल आणि शाहिस्तेखान - भाग १

स्वराज्यावर राहू केतू चालून आले होते ...त्यातला सिद्दी जौहरला राजांनी पन्हाळा गडाखाली ४ महिने झुलत ठेवले होते आणि संधी पोलादी वेढयातून राजे सुखरूप निसटले होते..पण शिवा काशीद, बाजीप्रभू आणि फुलाजी देशपांडे अशी नररत्ने कामी आली होती.. पुन्हा ताज्या दमाच्या विशाळगडाला चार पाच महिने वेढा घालण्याची ताकत आता सिद्दी जौहर मध्ये नव्हती आणि वेढा घातलाच तरी..राजे पुन्हा पळून गेले असते तर काय.. सिद्दी जौहरचा आत पुरता बिमोड झाला होता.. पण राहू गेला तरी अजून केतू आपला विषारी वेढा घालून लाल महालात गेली तीन वर्षे बसला होता..आणि त्याच्या बरोबर होते जवळ जवळ एक लाख ...Read More

2

लाल महाल आणि शाहिस्तेखान - भाग २

सर्व मंडळी निघाली ?? पद्मावती देवी आणि तुळजाभवानी आणि जिजामाता सर्वांचे आशीर्वाद पाठी घेऊन निघाली...फक्त ४०० जण होते..पुण्यापासून एक कोसावर राजे आणि त्यांचे सोबती घोड्यावरून उतार झाले..सर्जेरावांकडे पाहून म्हणाले "आमचे काही बरे वाईट झाले तर स्वराज्य राखा वाढवा".. सर्जेराव राजांना मुजरा करून आणि त्यांचे घोडे सोबतीला घेऊन सिंहगडाच्या दिशेने निघाले... काही पावलांवर मोगली वेढा दिसत होता.. चिमणाजी,बाबाजी पुढे आणि पाठी राजे आणि नेतोजी..प्रत्येक चौकीवर तपासणी होत होती..पण आपण छबिन्याचे शिपाई आणि गस्तीला गेलो होतो आणि आपले काम संपवून छावणीत आराम करायला परत चाललो आहोत ..हि थाप पचत होती..कारण शाहिस्तेखानाच्या ...Read More