बकुळीची फुलं

(57)
  • 90
  • 2
  • 48k

खडबडीत रस्त्यावर सामसूम होती …. रात्री पाऊस पडून गेल्याने पाण्याने रस्ते नाहून निघाले होते . गटारे , नाल्या तुडूंब भरल्या होत्या …. रस्त्याच्या कडेला असलेली बकुळाची झाडे लक्ष वेधून घेत होती . त्या बकुळाचं आणि आपलं खूप अगत्याचं नातं असावं असा अनुज झाडांकडे बघत होता मधेच समोर पाऊलं टाकत पुढे चालत होता … समोर गेला की परत मागे वळून त्या झाडाकडे बघत होता क्षणभरासाठी त्याला वाटलं की त्या झाडासमोर स्तब्ध उभं राहून काहीतरी बोलावं …एवढ्यात त्याला मागून कोणी तरी आवाज दिला .“अनुज …. अनुज … थांब ! ” ओळखीचाच पण खूप वर्षांनी ऐकलेला तो आवाज ऐकूून तो मागे वळला .”

New Episodes : : Every Monday, Wednesday & Friday

1

बकुळीची फुलं ( भाग - 1 )

खडबडीत रस्त्यावर सामसूम होती …. रात्री पाऊस पडून गेल्याने पाण्याने रस्ते नाहून निघाले होते . गटारे , नाल्या तुडूंब होत्या …. रस्त्याच्या कडेला असलेली बकुळाची झाडे लक्ष वेधून घेत होती . त्या बकुळाचं आणि आपलं खूप अगत्याचं नातं असावं असा अनुज झाडांकडे बघत होता मधेच समोर पाऊलं टाकत पुढे चालत होता … समोर गेला की परत मागे वळून त्या झाडाकडे बघत होता क्षणभरासाठी त्याला वाटलं की त्या झाडासमोर स्तब्ध उभं राहून काहीतरी बोलावं …एवढ्यात त्याला मागून कोणी तरी आवाज दिला .“अनुज …. अनुज … थांब ! ” ओळखीचाच पण खूप वर्षांनी ऐकलेला तो आवाज ऐकूून तो मागे वळला .” ...Read More

2

बकुळीची फुलं ( भाग - 2 )

” ये …. अरे आंधळा आहेस का तू ? दिसतं की नाही डोळ्याने … कोणी मुलगी जात आहे ते … ” अनुज घाईत ऑफिसकडे जायला निघाला होता .” राहू दे ना ! मी उचलते माझे बुक … तू आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे चेक करून घे स्वतःचे … ” त्याने ऐकून न घेता बुक उचलून देत तिच्या हातात ठेवले .” हे घे तुझी बुक्स … आणि i am really sorry … ” अनुज तिथून निघून गेला …” काय बावळट मुलगा आहे ना … कॉलेजचा पहिलाच दिवस स्पोईल केला ह्याने … “” काय झालं आदी , कुणावर रागावली आहेस ? ” ...Read More

3

बकुळीची फुलं ( भाग - 3 )

कॉलेजचा दुसरा दिवस उजाडला . पहिल्याच दिवशी अनुजला चांगला ग्रुप मिळाला होता . आणि अनुजने त्याच दिवशी ठरवलं आपण ग्रुपला धरून राहायचं ... छान आहेत ना सर्व .... हसरी मालती , बोलकी रेवा , निख्या तो तर जाम भडकतोच कधी कधी लहरी आहे तो ... प्रितम आहे बऱ्यापैकी मनमिळावू वृत्तीचा ... आदिती , तिचं नाव ओठावर येताच तो गालातल्या गालात हसला ... आधी वाटायचं मला , खूप रागीट असावी पण मनाने कशी भडभडी आहे ती .... तसच असायला पाहिजे तेव्हाचा राग , रुसवा तेव्हाच समोरच्या व्यक्तीवर काढून मोकळं झालेलं बरं ! नाही तर कुणाला सवय असते कुणाचा राग कुणावर ...Read More

4

बकुळीची फुलं ( भाग - 4 )

" विपिन आता कुठे असेल रे ? " आदितीचं हे वाक्य ऐकताच अनुज भूतकाळाच्या गर्देतुन बाहेर . " तुला आजही आठवण येते का ग त्याची ? " , " हो , मित्र म्हणून .... तू समजतो तसं काही नाहीये , माझं मन त्याच्यात कधी गुंतलच नाही . तो माझ्यासाठी खूप जवळचा मित्र होता त्यापलीकडे काहीच नाही . त्याचा तो हसरा विनोदी स्वभाव आठवला की वाटतं आजही तो आहे आपल्यात . तुला ठाऊक आहे ना अन्या , विपिन कधीच कुणाला sad मूड मध्ये दिसला नाही . कोणी दुःखी असलं की त्याला पोटधरून हसवायचा तो . प्रेम म्हणून नाही ...Read More

5

बकुळीची फुलं ( भाग - 5 )

" काय झालं अन्या , तुला ते दिवस आठवायला लागलेत ?"," हो अगं ..... ", " बहुतेकदा माणूस वर्तमान भूतकाळात जगत असतो .... विपिन गेल्यानंतर परत तो इनसिडेंट कधी आठवलाच नाही .... आणि आज त्याच्या घरून निघालो , प्रितम सोबत शेवटचं आठवलं .... "," यादे भी बड़ी करारी होती है ना अनुज .... "," हा यार , दिलसे दफ़नाती ही नही ..... "," अब छोड़ वो बाते .... कॉलेजचा टपरीवर घेऊन चालणार मला ..... "," का नाही .... बस्स एक कप चाय की तो बात है .... ", " हा चल ..... "," अगं पण , कार कुठे आणली मी running ...Read More

6

बकुळीची फुलं ( भाग - 6 )

कॉलेज संपून तीन महिने झाले होते ... सर्व डिग्री घेण्याकरिता कॉलेजमध्ये आले ... निखिल , रेवा , अनुज प्रितम ...... मालती सर्व कॉलेजच्या गेट समोरच भेटलीत . एकदाच कॉलेज संपल्यावर असं रोज रोज भेटणं आता कुणालाच शक्य नव्हतं . कॉलेजच्या आठवणी तश्याच ताज्या होत्या , रोजच्या पाणीपुरीची निखिलला आठवण झाली . कॉलेजच्या गेटसमोरून जातानाच त्याचं लक्ष बाजूच्या चारचाकीवर गेलं , आणि त्याने तिथेच साऱ्यांना थांबवून घेत पाणीपुरी खायचा हट्ट केला .... तारुण्यही कधीकधी बालिशपणाने जगायला भाग पाडतं ते असं .... वाऱ्यावर हलणारा बोर्ड ’ --------- स्पेशल पाणीपुरी सेंटर’ . आणि कॉलेजच्या बाजूला उभी रहाणारी ती चारचाकी , बहुतेकांना आपल्याकडे आकर्षित ...Read More

7

बकुळीची फुलं ( भाग - 7 )

" अरे ती काय आदिती ..... इकडेच येत आहे ..... " निखिल आदितीच नाव घेताच अनुज क्षणांचा विलंब करता मागे वळतो ...." अरे वा ! तुम्ही सर्व इथे पाणीपुरीचा आस्वाद घेताय ..... "" ओहहह ..... सॉरी आदि ..... अगं आम्ही तुझ्यासाठी थांबलो नाही .... "" सॉरी काय त्यात मालती .... मला यायला वेळ झाला थोडा ..... "" इट्स okay ना ..... चल आता खाऊन घे ..... "" नाही , मी just .... जेवण करून निघाले घरून ...."प्रितमला आदितीच्या हातात कसले तरी कार्ड दिसत होते , उत्सुकतेने तो तिला विचारायला गेला ," आदिती , तुझ्या हातात कसले कार्ड आहे का ...Read More

8

बकुळीची फुलं ( भाग - 8 )

तिला अनुजच्या चेहऱ्यावर पाच वर्षांचा भूतकाळ रेंगाळताना दिसला ... " अरे अनुज कुठे हरवलास तू ? " हा ... कुठे नाही अगं .... तुझ्या लग्नाचा काळ आठवतोय ...." सगळे प्रसंग अनुजसमोर काल परवा घडून गेलेल्या आठवणीसारखे ताजे होते . खोल खोल भूगर्भाच्या मध्याशी शिरावे तसे ...." अण्या आता लग्नाचा काळ आठवून काय फायदा .... जाऊदे हा विषय .... मला सांग , निख्या , प्रितम कसा आहे ? भेटतात का तुला ? रेवा , मालती लग्न होऊन गेल्या तेव्हापासून माझ्या संपर्कात नाही .... कॉल नाही की भेट नाही .... लग्न झाल्यावर खरचं यार माणूस एवढा ...Read More

9

बकुळीची फुलं ( भाग - 9 )

रूमची आवराआवर करता करता प्रितमच्या एकट्याची तारांबळ उडाली होती . सर्व पसारा त्याने सोफ्याच्या खाली भिरकावला . खिडक्यांचे ओढले . त्यावर परफ्युम मारला . साऱ्या रूमभर परफ्युमचा घमघामाट .... दोन , तीन दिवसांचा मुकामी असा पंधरवाड्याचा पसारा मांडून ठेवेल ह्याची कोणी कल्पना न केलेली बरी . बाहेर दाराची बेल वाजत होती . आली असावी ही म्हणून प्रितम दार खोलायच्या आधीच काचेतून बघू लागला . " बापरे सहा वर्षाने भेटतोय आपण .... अजूनही तशीच आहे तू .... बारीक झाली एवढंच ..... का ग नवरा खायला देत नाही की मारझोड करतो .... " आदिती मात्र ...Read More

10

बकुळीची फुलं ( भाग - 10 )

" सॉरी ..... तुला दुखवण्याचा उद्देश नव्हता माझा .... "" तुझ्या बोलण्याने दुःखी कधीच नाही होत ग मी .... सांगू .... "" हा सांग की , सांगायला काय परवानगी घेतो आहे ... " " आयुष्य म्हणजे खडतर प्रवास का ग ? निवळ आपल्या वाट्याला येईल तसा जगावा , आठवड्या पूर्वीचा प्रसंग आहे .... इथे यायला निघालो तेव्हा , एक आदिवासी बाई ST मध्येच बाळंत झाली . तिच्या त्या कांठाळ्या बसवणाऱ्या कळानी मलाच गहिवरून आले ... तुला सांगू त्यावेळी मनात असंख्य प्रश्नाने गर्दी केली होती मनात असा कोलाहोल झाला होता प्रश्नांचा . अश्या आदिवासी स्त्रिया डोंगरकपारीत, झाडाझुडुपांमध्ये बाळंत होतात . घनदाट ...Read More

11

बकुळीची फुलं ( भाग - 11 )

काळोखातलं प्रखर चांदणं आणि मंदमस्त वारा ह्या निसर्गी निर्मित वातावरणाचा मिलाफ म्हणजे स्वर्ग सुखं उपभोगल्या सारखं वाटू लागतं..... निर्विकार थंड वारा अनुजच्या देहाला भेदत होता... दुपार पर्यंत काय पावसाची सततची रिपरिप चालू होती , आणि आता बघा अवकाशात चांदण्याचा सडा... लुकलुकणाऱ्या चांदण्याकडे बघत अनुज एकांतात स्वतःशीच गप्पा मारत टेरिसवर उभा होता . हातातला कॉफीचा मग ठेऊन त्याने खिशातून फोन काढला आदितीला कॉल करू का ? नाही नको , ... असं म्हणत त्याने खिश्यात फोन ठेऊन दिला . खरचं येईल का ती ? की जाईल ह्या खेपेलाही तशीच न सांगता निघून.... दोन , तीन दिवस तशीच निघून गेली... आदितीला अनुजचा ...Read More