भटकंती ...सुरुवात एका प्रवासाची ..

(52)
  • 111.8k
  • 15
  • 47.7k

आकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पावसाचे थेंब मिसळून, घुसळून एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. त्या थंड वाऱ्याच्या झोतानेच त्याला जाग आली होती. आकाश त्याच्या तंबू मधेच पहुडला होता. डोळे उघडले आणि तंबू मधून डोकं बाहेर काढलं. छान वारा सुटला होता. प्रसन्न वातावरण अगदी, तसाच डोळे चोळत बाहेर आला. अंग आळोखे - पिळोखे देत वाकडं-तिकडं करत आळस दिला. घड्याळात पाहिलं तर सकाळचे ७.३० वाजत होते. तरीही अजून सूर्य देवाचे आगमन झाले नव्हते. आकाश तंबू पासून जरा पुढे आला. आजूबाजूला बघू लागला.

Full Novel

1

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग 1)

आकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत त्यात पावसाचे थेंब मिसळून, घुसळून एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. त्या थंड वाऱ्याच्या झोतानेच त्याला जाग आली होती. आकाश त्याच्या तंबू मधेच पहुडला होता. डोळे उघडले आणि तंबू मधून डोकं बाहेर काढलं. छान वारा सुटला होता. प्रसन्न वातावरण अगदी, तसाच डोळे चोळत बाहेर आला. अंग आळोखे - पिळोखे देत वाकडं-तिकडं करत आळस दिला. घड्याळात पाहिलं तर सकाळचे ७.३० वाजत होते. तरीही अजून सूर्य देवाचे आगमन झाले नव्हते. आकाश तंबू पासून जरा पुढे आला. आजूबाजूला बघू लागला. ...Read More

2

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग 2)

पावसाळा सुरू झालेला. या दोघीना खूप आवडायचा पाऊस, त्यात भिजायला तर किती आवडायचं. विशेष करून सुप्रीला, पावसाळ्यात तर दर या दोघींच्या पिकनिक ठरलेल्या. कधी ऑफिसच्या ग्रुप बरोबर, तर कधी त्यांच्या मित्र-मैत्रिणी सोबत, कधी फॅमिली सोबत आणि तसंच कोणी भेटलं नाही तर दोघीच जायच्या भिजायला. दोघीना एकमेकांशिवाय करमायचे नाही. अशीच त्यांची मैत्री होती, अतूट अशी. पण यंदाच्या पावसात काहीतरी वेगळं होणार होतं. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पावसाचे दिवस, त्यात रस्तावर पाणी साचलेलं. संजनाला scooty वर असताना मुद्दाम पाण्यातून गाडी घेऊन जायची सवय. उडणारे पाणी बघून तिला वेगळाच आनंद मिळायचं. त्यात सुप्री मागे असली कि विचारूच ...Read More

3

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ३)

आकाशचे सर आता त्याच्याजवळ आले. काय मग... कसं वाटलं नवीन ऑफिस..... आकाश... , ठीक आहे... तसं मला कूठे आवडते शहरात..... त्यामुळे आहे ते चांगलंच असणार ना माझ्यासाठी... , बरं... काही फोटोज आणले आहेत, ते पाठवून देतो... , चालेल. आणि किती दिवस आहेस आता इकडे... , बहुतेक हा आठवडा आहे मी, काल घरी जाऊन आलो तर आईची तब्येत ठीक नाही... त्यासाठी थांबतो आहे.... या ऑफिसमध्ये आलं तर चालेल ना आठवडाभर.... , तू कूठेही कामं करत बस.... दोन्ही ऑफिस मध्ये तुझं स्वागतच असेल... फक्त शहरात राहत जा रे... काय असते तिथे राना-वनात त्यावर आकाश हसला फक्त. तिथे खूप काही असते म्हणून ...Read More

4

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ४)

चार दिवस सहल होती त्यांची.... तशी दरवर्षी पावसात सहल जायची त्यांची.... प्रत्येकवेळेस एक-एक दिवसच जायची. यावेळेस मात्र जरा जास्त ठरवली होती. एका अनोळखी ठिकाणी जायचे हे ठरले होते.एकूण २० लोकं तयार झाले. त्यात मुलींची संख्या होती बऱ्यापैकी. राहायचे होते म्हणून प्रत्येकी दोन माणसांमागे एक असे तंबू सुद्धा घेतले होते. प्रत्येकाकडे त्या भागाचा मॅप बनवून दिला होता, त्यातल्यात्यात कोणी हरवू नये म्हणून. सर्व तयारी झाली आणि सगळे निघाले. प्रथम गाडीने प्रवास करून ते ठरलेल्या जागी पोहोचले. प्रवास सुरु झाला. २० जणांमध्ये संजना, सुप्री सुद्धा होत्या. त्यातल्या त्यात ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव होता ते पुढे होते. सगळ्याकडे त्या भागाचा मॅप असला तरी ...Read More

5

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ५)

आम्ही रस्ता हरवलो.... दुसरीकडे जायचे होते आम्हाला, भलतीकडेच आलो. तसे सगळ्यांकडे मॅप आहेत, तरी कसे हरवलो काय माहित ? आकाश हसला त्यावर... इकडे नकाशे वगैरे असा काही चालत नाही. फक्त डोळ्यासमोर जे दिसते ते खरं असते. , पण आता आम्हाला घरी जायचे आहे... आम्ही ज्या ठिकाणी गाडीने उतरलो , तो रस्ता तरी माहित आहे का तुम्हाला. तिथे गेलो कि कोणतेतरी वाहन मिळेलच ना आम्हाला. अजून एकाने मधेच विचारलं. म्हणून विचारलं मी, कि इथे येण्याचा प्लॅन कोणाचा होता..... कसलीच माहिती नाही तुम्हाला इथली. तुम्ही ज्या गाडीने आलात, तो शेवटचा दिवस होता... त्या गाडयांचा... आता पुढे दोन महिने या भागातले सर्व रस्ते ...Read More

6

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ६)

आकाशने सांगितल्याप्रमाणे, सगळा ग्रुप एका ठिकाणी येऊन पोहोचला. आजूबाजूला झाडं-झुडुपं होती. फक्त मधेच तेव्हढी जागा रिकामी राहिली होती. तेव्हा कळलं, आकाशचं बोलणं. आकाशने घड्याळात पाहिलं, दुपारचे ३.३० वाजत होते. चला, पटपट tent लावून घेऊया, नंतर जेवणाची सोय करावी लागेल. सगळ्यांनी tent बाहेर काढले. आकाशला तर सवय होती tent मध्ये राहायची. १० मिनिटात त्याने एकट्यानेच त्याचा तंबू उभा केला. बाकीचे मात्र अजूनही 'तंबू कसा बांधायचा' ते पुस्तकात बघून बघून फक्त प्रयन्त करत होते. आकाशला हसायला आलं. एकालाही येत नाही का ... आकाशने विचारलं... आम्ही काय रोज येत नाही इथे... तंबू बांधायला यायला. सुप्री वेडावून दाखवत म्हणाली. आकाशने तिच्याकडे दुर्लक्ष ...Read More

7

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ७)

सकाळ जरा लवकरच झाली सुप्रीची. घड्याळाचा काटा ७ वर होता. बाहेरचा आढावा घेण्यासाठी तिने हळूच डोकं बाहेर काढलं. अजून होते. सगळीकडे धुकं होतं. समोरचं तसं पण काहीच दिसतं नव्हतं. उत्सुकता खूप भरलेली होती सुप्रीमधे.... तशी हळूच ती बाहेर आली. बाहेर तरी तिच्या शिवाय कोणीच नव्हतं. बाकीचे tent अजून तरी बंदच होते आणि त्यातील प्राणी अजून चादरीत गुरफटलेले होते. हळूच तिचं लक्ष आकाशच्या तंबूकडे गेलं. तंबूचं प्रवेशद्वार तिला जरा उघडं दिसलं. पुन्हा एकदा कुतूहलाने सुप्री पुढे गेली. एका डोळ्याने तिने आतमध्ये चोरून बघितलं. तर आत कोणीच नव्हतं, तसं तिने पूर्णपणे आत डोकावून पाहिलं. बापरे !!! कुठे गेला हा माणूस... तशीच ...Read More

8

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ८)

समोर एक मोठ्ठा डोंगर दिसत होता. अजूनही धुकं होतंच. तरी सूर्यप्रकाशामुळे धुकं हळूहळू विरळ होतं होते. समोरचं द्रुश्य अजूनच दिसायला लागले होते. लांबच्या लांब तो डोंगर पसरला होता. काही ठिकाणी ढग विसावले होते. मधून मधून उंचच उंच धबधबे आणि झरे ओसंडून वाहत होते. पाणी मिळेल त्या वाटेतून स्वतःला झोकून देत होते. पूर्ण डोंगर हिरव्याकंच हिरवाईने नटून गेला होता. मधूनच एखादा पक्षांचा थवा नजरेस पडत होता. नजर जाईल तिथे हिरवळ आणि झरे.... त्यात सूर्योदय होतं असल्याने पूर्ण हिरवाई आता चमकत होती. आजूबाजूने वाहणाऱ्या धुक्याने त्या सर्वांचे चेहरे आणि कपडे ओले केले होते. त्यात मधेच येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकेने अंग शहरल्या ...Read More

9

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ९)

आकाश परतला तेव्हा संध्याकाळची उन्ह परतू लागली होती. घड्याळाचा काटा ६ वर आला होता. आकाश सुद्धा दमलेला होता. प्रथम गावात जाऊन अंघोळ करून आला. थोडंसं खाऊन आणि रात्रीच्या जेवणाचं सांगून तो आपल्या tent मध्ये आला. सगळे त्याचीच वाट बघत होते. एवढंच कि सगळे वेगवेगळे, २-३ जण एका बाजूला निवांत गप्पा मारत बसले होते. " मिळाला का रस्ता तुला... सॉरी तुम्हाला. " संजना जीभ चावत म्हणाली. " मिळाला... उद्या निघू पहाटे... " आकाश सॅक एका बाजूला ठेवत म्हणाला. " बाकी सगळे जेवलात ना पोटभर... ","हो..","आणि तुमची friend... ती कुठे दिसत नाही ती... " आकाश आजूबाजूला बघत म्हणाला. " ती ना... ती बघा तिथे ...Read More

10

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १०)

पुढचा stop म्हणजे आकाशने बघितलेलं गावं ... ते सुद्धा तसं लांबच होतं, पण आकाशच्या calculation नुसार संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता तसाच आकाशचा अंदाज होता. परंतु निसर्गाला ते मान्य नसावं बहुदा. तो लहान डोंगर उतरून ते खाली येतंच होते. तेवढयात ,कुठून कोणास ठाऊक, जोरदार वारा सुरु झाला,अगदी अचानक. सगळेच घाबरून गेले. आकाश सुद्धा बावरून गेला. थोडयावेळाने सावरलं स्वतःला त्याने. पण तो वारा काही कमी होतं नव्हता.त्यात पावसाने सुद्धा सुरुवात केली. अजूनच भांबावून गेले सगळॆ. काय करायचे ते सुचत नव्हते आकाशला. गावं तसं लांबच होतं ते. तिथे पोहोचणं तर गरजेचं होतं. शिवाय त्या वादळापासून सुद्धा या सगळ्यांना वाचवायला हवे. आकाशने वर आभाळात ...Read More

11

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ११)

अर्ध्या-पाऊण तासाने पावसाने विश्रांती घेतली. तोपर्यंत आकाश तसाच विचार करत बसला होता. सुप्री दुरूनच बघत होती. काहीच हालचाल होत म्हणून स्वतः आकाश जवळ गेली. " निघूया का पुढच्या प्रवासाला... म्हणजे आता पाऊस सुद्धा थांबला आहे म्हणून म्हटलं... " आकाश भानावर आला." ते दोघे तयार आहेत का पण... " आकाशने उलट प्रश्न केला. " त्यांना तयार करतो आम्ही... आपण निघूया... " सुप्रीने बाकी सगळ्यांना तयार केलं निघण्यासाठी. आकाशसुद्धा तयार झाला. फक्त प्रश्न होता कि जायचे कुठे . समोरचा रस्ता जवळपास बंद... पूल असून सुद्धा तिथे आता जाणे धोकादायक होते कारण नदीचं पाणी काठापासून खूप आत शिरलं होतं. आकाश पुन्हा काही आठवू लागला. ...Read More

12

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १२)

पुढचा दिवस, आकाशचा पाय आता दुखत नव्हता तरी देखील मलमपट्टी तशीच ठेवली होती. त्यामुळे आकाश आतातरी, स्वतःच्या पायावर उभा शकत होता. जाग आली तसा तो झोपडी बाहेर आला. पाड्यातली बहुतेक मंडळी जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी निघत होती. आकाशचा ग्रुप तेव्हढा एकत्र बसून गप्पा-गोष्टी करत होता. आकाशला बाहेर आलेलं बघून ,सगळे त्याच्याभोवती गोळा झाले. आकाशला त्या दोघांनी Sorry, thank you बोलून झालेलं. पण तुम्हाला घरी जायला अजून उशीर होणार... कारण माझा पाय बरा झाला नाही , तर हे सोडणार नाहीत. आकाश बोलला. हो सर... तुम्ही काही टेन्शन घेऊ नका... ज्याला घरी जायचे असेल ना त्याला आपण नदीत टाकून ...Read More

13

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १३)

आकाशने पुढचा रस्ता, सखाला विचारून बनवला होता. परंतु अर्धाच रस्ता सखाला माहित होता. फक्त त्याने सरळ जाण्यास सांगितले होते. तसा सरळ नव्हताच. प्रचंड रानं होतं. झाडा-झुडुपातून वाट काढत जावे लागत होते. त्या गावाच्या मंदिराचा कळस तेवढा दिसला होता आकाशला. त्यावरून आकाशने एक अंदाज लावला होता. आज जेवढं अंतर पार करता येईल तेवढं पार करायचं. संध्याकाळ होण्याच्या आधीच कुठेतरी थांबायचे... कारण सखा बोलला असला तरी आज त्या गावात संध्याकाळ पर्यंत पोहोचणं शक्य वाटतं नव्हतं. हे त्याने सगळयांना बोलून दाखवलं. सगळ्यांना ते पटलं. " सगळ्यांनी पटापट पाय उचला... आज पोहोचू शकत नाही तिथे पण जास्त अंतर ...Read More

14

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १४)

निघाले तेव्हा सकाळचे ७.३० वाजले होते. सूर्य जणू नुकताच वर येत होता. त्यामुळे पूर्वेकडचे आभाळ सोनेरी रंगाने नटून गेलं पावसाची काहीच चिन्ह नव्हती, म्हणूनच कि पक्ष्यांची सकाळ लवकर होऊन ते आपापल्या कामाला निघून गेले होते. त्यांच्या जाण्याने झाडं चिडीचूप झाली होती.... जमिनीवर सगळीकडे हिरवी रानटी गवत पसरलेली होती. त्यावर किड्यांची मैफल जमली होती. मधेच एक पायवाट, त्यावर सारखं सारखं चालून तयार झाली होती, इथून लोकांची सारखी ये-जा होतं असते, याचे प्रतिक होतं ते. सकाळचे धुकं आता त्या गवतांच्या पानांवर विसावलं होतं, थेंबांच्या रूपाने... त्यावर सूर्याची किरणे पडून, थोडावेळ का होईना.. गवताला सोन्याची किंमत आली होती. चालता चालता आकाशची नजर ...Read More