कोकणातले भोरपी

(4)
  • 75
  • 0
  • 4.1k

लावणी सुरू होण्याचा हंगाम आलेला होता. त्यावेळी सकाळ संध्याकाळ दोन वेळा शाळा भरायची. नऊ वाजता लघवीची सुटी झाली नी आम्ही वर्गा बाहेर पडून देवराईकडे दडदडत निघालो. ग्रामपंचायती समोर एस्टीची गाडी वळून जायची तिथे आलो नी बघतो तर काय ...... उघडे बंब काष्टी लावणारे चार पाच बापये शंकरेश्वराच्या ओवरी बाहेर चिंचेखाली सात आठ बांग़र पाडे घेवून उभे होते. त्यातल्या दोघा जणांनी बाही छट मुंडी- कोपरी घातलेली होती. पोरगेला होता त्याने घाटवळी घालतात तसला पोटावर खिसा असलेला गोल गळ्याचा मांजरपाटाचा गंजीफ्रॉक वजा सद्रा घातलेला होता. आम्ही लघवी करून आलो तो पर्यंत चिंचेखाली दोन तीन लाकडी खुंट्या ठोकून त्याना पाडे टांगलवून बापये चिंचेच्या पाळांवर बूड टेकून बसलेले होते. त्यातला एकजण चिलीम ओढीत होता त्याने दोन झुरके मारून चिलीम सोबत्याकडे दिली. बापयातला पोरगेलासा होता तो वगळता बाकी सगळ्यानी झुरके मारले. शेवटच्याने दोन तीन झुरके मारल्यावर चिलिम उलटी करून रिकामी केली फडका गुंडाळून खिशात ठेवली. तेवढ्यात तीन चार बाईल माणसे नी चार पाच पोरांची फटावळ आली नी डोक्यावरची काचकी बोचकी देवळाच्या तटाजवळ ठेवून बाईल माणसे तिथेच फतकल मारून बसली. ते कोण काय सगळी इत्थंभूत माहीती सहावी सातवीतल्या जाणत्या पोरानी दिली. ते भोरपी होते.

1

कोकणातले भोरपी - भाग 1

कोकणातले भोरपी भाग 1 लावणी सुरू होण्याचा हंगाम आलेला होता. त्यावेळी संध्याकाळ दोन वेळा शाळा भरायची. नऊ वाजता लघवीची सुटी झाली नी आम्ही वर्गा बाहेर पडून देवराईकडे दडदडत निघालो. ग्रामपंचायती समोर एस्टीची गाडी वळून जायची तिथे आलो नी बघतो तर काय ...... उघडे बंब काष्टी लावणारे चार पाच बापये शंकरेश्वराच्या ओवरी बाहेर चिंचेखाली सात आठ बांग़र पाडे घेवून उभे होते. त्यातल्या दोघा जणांनी बाही छट मुंडी- कोपरी घातलेली होती. पोरगेला होता त्याने घाटवळी घालतात तसला पोटावर खिसा असलेला गोल गळ्याचा मांजरपाटाचा गंजीफ्रॉक वजा सद्रा घातलेला होता. आम्ही लघवी करून आलो तो ...Read More

2

कोकणातले भोरपी - भाग 2

कोकणातले भोरपी भाग 2 मथवून मथवून त्या माणसालाडफ़ावर चढवला की, तो मागचा पुढचा विचार नकरता चढ्या दराने सौदा करी. जनावरसोडून त्याच्या ताब्यात देताना जमलेल्यां पैकीकोणीतरी चौकशी केली की बिलंदरभोरपी ठरलेल्या दरापेक्षा आणखी वीस पंचवीस जादाचा आकडा फोडीत. उलट जनावर खरेदी करताना जनावर बघितल्यावर त्याना अचूकअंदाज यायचा. हेजनावर वय झालेलं आहे, लंघलेलं आहे. आपल्याखेरीज दुसरंकोणीही गिऱ्हा ईक हे उचलणार नाही. हे पक्कंहेरून ते ढोराची केंड करीत.“अरा ऽऽरा, निस्तंकातडं नी हाडं हाईतशेठ. आमी धा गाव फिरणारं. वाटेलाकुटे गचकलं तर मुदलातच बूड......” नी अगदी पडत्याभावाने आकडा फोडीत. मालक रंजीस येवून काय काय बतावण्या करीत असे. पण भोरपीसहसा मागितल्या शब्दाबाहेर छादामही जादा ...Read More

3

कोकणातले भोरपी - भाग 3

कोकणातले भोरपी भाग 3 एखादं आयदण विणून ते पुंग़ळ्या नी ग़ोळ्या गुतवून उजू होईतो प्रचंड असते. हे अत्यंत किचकट नी वेळमोडं काम असतं. जाळी विणताना आटीचा धागा संपला की त्याच्या टोकाला नव्या आटीतला धागा विशिष्ट पद्धतीची गाठ मारून जोडावा लागतो. कारण वापर करताना ती गाठ नडीला येता कामा नये. नायलॉनचा धागा वापरात येण्याआधी आंबाडी, ताग आणि किशिष्ट प्रक्रिया करून सुती दोरा चिवट करून तो वापरला जायचा. भोरपी आले त्यावेळी वरच्या वाडीत सरवज्याच्या घराजवळ रस्त्यावर बांधलेल्या मोरीच्या विरुद्ध बाजूला पावसाळी पाण्याच्या व्हावटीमुळे पुरुषभर खोल कोंड होती. त्यात वीत भर लांबीचे पिंगट रंगाचे मासे दिसायचे. आमचा वाटेली, ...Read More

4

कोकणातले भोरपी - भाग 4

कोकणातले भोरपी - भाग़ ४दोन तुकड्याची साडी नेसलेल्या बाईने त्यातली बरीशी साडी उचलून आशाळभूत चेहेरा करीत म्हटले. “ मावशी माजं ह्ये कापाड – नेसूचं लुगड अक्शी निमता पुरतं ऱ्हायलया बगा...... ह्ये कापाड म्यां घ्येतो , माजं दोन मोसम निभतील...... न्हाई म्हणू नुको . वाकळीच्या मजुरीस्नं झालं तरी पैसं कापून घिया........” त्यावर हसून आई म्हणाली, “अगो तीचा पदर विरला होता म्हणून तो फाडून टाकलाहे पुऱ्या लांबीचं नाहिये ते. ” क्षणाचीही उसंत न लावता मोठी भोरपिणी म्हणाली, “ तेला काय करणार, भण माजी बारकुड्या अंगाची हाय त्याला होईत बरोबर. आता अंगावर हा त्येच्या पक्षा जादा भरतंय .....” ...Read More

5

कोकणातले भोरपी - भाग 5

कोकणातले भोरपी- भाग ५ दुसरे दिवशी दोघीही वेळेवारी आल्या. आईने दिलेली चहा चपाती खावून त्या कामाला लागल्या. अंगणात रेवे घेवून खेळायला लागली. मी शाळेतून आलो तेंव्हा बरच काम पुरतावत आलेलं होतं बारा वाजता गोधड्या पुऱ्या झाल्या. “जुन्या फाट्लेल्या वाकळा थांग़डायच्या असल्या तर दे मावशी” पोरगेली भोरपीण आईला म्हणाली. जुन्या दोन तीन गोधड्या एकदोन ठिकाणी विरल्या होत्या. त्याना फाटलेल्या टीच भर वीतभर ढिगळं मारून त्या धडावून झाल्यावर काम संपलं . आजही आईने पुन्हा भाताचे ठाय लावून आणल्यावर भोरपीणी ओशाळून बोलल्या. “ मावशी, च्या चपाटी रग्गड झालती की . पुना आणी जेवाण कशा पायी..... ” जेवून झाल्यावर आई हिशोबाची ...Read More

6

कोकणातले भोरपी - भाग 6

कोकणातले भोरपी- अंतिम भाग ५गावातल्या जाणत्यानी वाड्यात जावून तंडामुंडी केल्यावर घेतल्या किमतीत वीस रुपये कमी करून नव्याने सौदा ठरवून बैल दिला. तो मात्र वहिवाटला. त्याच दरम्याने फणशात दहा भांगे जमिन घेवून रुक्म्या भोरपी तिथे स्थाईक झाला . त्याने तो पाडा आपल्याकदे बाळगला. पावसाळी शेती नी उन्हाळी फडक्यांचे माडा पोफळीचे आगर तो अर्धलीने करी. तिथे बैल रहाट ओढायचे काम बैल मुकाट्याने करी. रुक्म्याकडे तो वीस वर्षे इमाने इतबारे जोत नी बैल रहाट ओढायचे काम करी. पुढचे दात पडले नी दाढा पडल्या नी बैल रवथाचे बोळे टाकायला लागल्यावर रुक्म्याने तो राधानगरीच्या बाजारात खाटकाला विकला. अकरावी झाल्यावर आम्ही कॉलेज शिक्षणासाठी ...Read More