मी होळीसाठी तळकोकणात, गोवा सीमेवरच्या त्या सुंदर खेडेगावात सायंकाळी पोहोचलो होतो. मी अगोदरच देवस्थानच्या अध्यक्षांशी संपर्क साधला होता.मला तिथल्या होळी व गडे उत्सवावर एक माहितीपट बनवायचा होता.त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था एका परब नावाच्या मानकर्यांकडे केली होती. पहिल्या दिवशी होळी उभी करण्याचा क्षण मी चित्रीत केला.साठ फुटा पेक्षा उंच सरळ सोट व जाड अश्याआंब्याच्या झाडाची होळी ज्या कुशलतेने उभी केली ते बघण्यासारखे होत.होळीभोवती गवत ( कराड) पेटवून रोंबाट घातलं गेलं.तरूणांचा उत्साह जबरदस्त होता.नमण झालं.मानकर्यांने गार्हण घातलं. लोकांची आंगवणी व गार्हाणी झाली.कोकणातलं गार्हाण हा प्रकार आगळा वेगळा होय." बा, म्हराजा " पासून सुरुवात होते.
मुखवटे - 1
मुखवटे (गूढ दिर्घ कथा- बाळकृष्ण सखाराम राणे)मुखवटे भाग १मी होळीसाठी तळकोकणात, गोवा सीमेवरच्या त्या सुंदर खेडेगावात सायंकाळी पोहोचलो होतो. अगोदरच देवस्थानच्या अध्यक्षांशी संपर्क साधला होता.मला तिथल्या होळी व गडे उत्सवावर एक माहितीपट बनवायचा होता.त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था एका परब नावाच्या मानकर्यांकडे केली होती. पहिल्या दिवशी होळी उभी करण्याचा क्षण मी चित्रीत केला.साठ फुटा पेक्षा उंच सरळ सोट व जाड अश्याआंब्याच्या झाडाची होळी ज्या कुशलतेने उभी केली ते बघण्यासारखे होत.होळीभोवती गवत ( कराड) पेटवून रोंबाट घातलं गेलं.तरूणांचा उत्साह जबरदस्त होता.नमण झालं.मानकर्यांने गार्हण घातलं. लोकांची आंगवणी व गार्हाणी झाली.कोकणातलं गार्हाण हा प्रकार आगळा वेगळा होय. बा, म्हराजा पासून सुरुवात होते.मग ...Read More
मुखवटे - 2
मुखवटे भाग ३काही क्षणातच राखणदार एका दगडाखाली असलेल्या गुहेवजा जागेत पोहचला.मी ही पाठोपाठ होतो. मशालीच्या उजेडात तिथला परिसर उजळला.तिथे मनुष्य खडकाला टेकून बसवलेला होता.तो समाधी लावल्यासारखा स्थिर होता.कोण होता तो इसम...एखादा लपवलेला गडा! हो तो गडाच असणार. त्याच्या अंगावर गड्याचा वेष होता.काल न मिळालेला गडा म्हणजे कस्टम ऑफिसर बाबीनाईक तर नव्हे ?" तू विचार करतोयस ,तोच हा गडा आहे.पण मी त्याला लपवलेलेनाहीय.तर काही दुष्ट प्रवृत्ती त्याला पळवत होत्या .पण मी त्याला सोडवलंय. मी असताना...माझ्या सीमेत कुणी अस धाडस करू शकत नाही." राखणदार म्हणाला." पण ...पण मी फक्त हा उत्सव जाणून घेण्यासाठी आलोय. मी काय करू शकतो !" मी घाबरत ...Read More