मिशन खोडद : पृथ्वीवरील पहिला देवमाणूस

(0)
  • 18
  • 0
  • 315

खूप खूप वर्षांपूर्वीची, अगदी करोडो वर्षांपूर्वी आपल्या सूर्याची व आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली. पृथ्वी तयार झाली खरी पण आज आपण चंद्र आणि मंगळ ग्रह पाहतो ना अशीच काही आपल्या पृथ्वीची सुद्धा अवस्था होती, बंजर जमीन, खड्डे, मध्येच घोंगवणारे आवाज, पण जमिनीच्या आत मोठ्या प्रमाणात हालचाली होऊन अनेक वायू बाहेर पडले.

1

मिशन खोडद : पृथ्वीवरील पहिला देवमाणूस - भाग 1

खूप खूप वर्षांपूर्वीची, अगदी करोडो वर्षांपूर्वी आपल्या सूर्याची व आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली. पृथ्वी तयार झाली खरी पण आज चंद्र आणि मंगळ ग्रह पाहतो ना अशीच काही आपल्या पृथ्वीची सुद्धा अवस्था होती, बंजर जमीन, खड्डे, मध्येच घोंगवणारे आवाज, पण जमिनीच्या आत मोठ्या प्रमाणात हालचाली होऊन अनेक वायू बाहेर पडले. अनेक वायूंनी आकाशमंडळ धूर, धुके, व वायूनी भरून गेले. व अनेक वर्ष सतत रात्रंदिवस सारखा पाऊस पडू लागला व यातूनच जमिनीवरील पाणी उताराने वाहत जाऊन समुद्र व महासागर तयार झाले.व हळूहळू पाण्यात वनस्पती तयार झाल्या आणि अशाच वनस्पती पाण्याबाहेर व जमिनीवर तयार झाल्या. व पाण्यात लहान जीव तयार होऊन लहान ...Read More