शेअर मार्केट बेसिक्स

(3)
  • 0
  • 0
  • 1.9k

१) Equity Shares (समभाग): सामान्यपणे याला आपण 'शेअर्स' असे म्हणतो. एखाद्या कंपनीचा एक शेअर हा त्या कंपनीतील मालकीचा एक वाटा/हिस्सा असतो. समजा, अबक नावाची एक कंपनी आहे, तिची अंदाजीत किंमत १००० करोड रुपये आहे, मग १ रुपया प्रती शेअर प्रमाणे कंपनीने ५० टक्के मालकी हक्क विकायला काढला, म्हणजे एकूण ५०० कोटी शेअर्स विकायला काढले, राम नावाचा एक गुंतवणूकदार त्या कंपनीचे १०० कोटी शेअर्स विकत घेऊन गुंतवणूक करतो व अशाप्रकारे रामला त्या कंपनीमध्ये १० टक्के मालकी हक्क प्राप्त होतो.

1

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1

Securities (रोखे) १) Equity Shares (समभाग): सामान्यपणे याला आपण 'शेअर्स' असे म्हणतो. एखाद्या कंपनीचा एक शेअर हा त्या मालकीचा एक वाटा/हिस्सा असतो. समजा, अबक नावाची एक कंपनी आहे, तिची अंदाजीत किंमत १००० करोड रुपये आहे, मग १ रुपया प्रती शेअर प्रमाणे कंपनीने ५० टक्के मालकी हक्क विकायला काढला, म्हणजे एकूण ५०० कोटी शेअर्स विकायला काढले, राम नावाचा एक गुंतवणूकदार त्या कंपनीचे १०० कोटी शेअर्स विकत घेऊन गुंतवणूक करतो व अशाप्रकारे रामला त्या कंपनीमध्ये १० टक्के मालकी हक्क प्राप्त होतो. २) Debt Securities (कर्ज रोखे): एखादी कंपनी किंवा संस्था रोखे (Securities) मार्केटमध्ये आणून त्याद्वारे गुंतवणूकदारांकडून काही काळासाठी पैसे कर्ज ...Read More

2

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 2

शेअर मार्केट बेसिक्स – भाग २ : मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर व रिस्कचे प्रकार मित्रांनो, आपण या भागात, मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर, व रिस्क याबद्दल माहिती घेऊ: रोखे बाजारात व्यवहार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्टॉक एक्स्चेंज, क्लियरिंग कॉर्पोरेशन्स, डिपॉजिटरी याद्वारे पुरविल्या जातात, या संस्थांना ‘मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इंस्टीट्यूशन्स’ म्हटले जाते. स्टॉक एक्स्चेंज: स्टॉक एक्स्चेंज हे पूर्ण देशभर संगणक आधारित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पुरवितात, ज्याद्वारे त्यांच्या नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर्सच्या मध्यस्थीने शेअर्सची खरेदी-विक्री करता येते. ही खरेदी विक्री एका निश्चित किंमतीला व न्याय्य रीतीने पार पडते. BSE लिमिटेड, NSE लिमिटेड, मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्स्चेंज (MSE) हे देशभर उपलब्ध असलेले मुख्य स्टॉक एक्स्चेंज आहेत. क्लियरिंग कॉर्पोरेशन्स: स्टॉक एक्स्चेंजवर झालेल्या ...Read More

3

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 3

अकाऊंट ओपनिंग व प्रायमरी मार्केट गुंतवणूक मित्रांनो, रोखे बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता असते: १) बँक अकाऊंट: रोखे गुंतवणूक करण्यासाठी, देशातील कोणत्याही मोठ्या बँकेमध्ये, बँक अकाऊंट असणे गरजेचे आहे. अशी बँक निवडा जिचे एटीएम कार्ड मिळते, जी बँक ऑनलाइन सुविधा देते, जिचे अकाऊंटUPI सुविधांबरोबर लिंक करता येते. यामुळे ट्रेडिंग अकाऊंटमध्ये पैसे टाकणे सोयीस्कर होईल. २) ट्रेडिंग अकाऊंट: ट्रेडिंग अकाऊंटचा वापर करून आपण रोखे बाजारातील खरेदी-विक्रीचा व्यवहार करू शकतो. ट्रेडिंग अकाऊंट शिवाय असा व्यवहार करता येत नाही. हे ट्रेडिंग अकाऊंट आपल्याला स्टॉक ब्रोकर्सच्या माध्यमातून काढता येते. आपल्या देशात अनेक स्टॉक ब्रोकर्स उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे आपल्याला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ...Read More

4

शेअर मार्केट बेसिक्स - भाग 4

ट्रेडिंग सेटलमेंट सायकल मित्रांनो, आपण आज एखादा शेअर डिलीवरी मध्ये म्हणजेच काही दिवस होल्ड करण्यासाठी खरेदी केला असेल तर आजच आपल्या डीमॅट अकाऊंट मध्ये जमा होत नाही, त्यासाठी एक दिवसाचा वेळ लागतो. यालाच t+1 ट्रेडिंग सायकल म्हटले जाते. T म्हणजे ज्या दिवशी ट्रेड / व्यवहार पार पडला तो दिवस आणि +1 म्हणजे व्यवहार झालेल्या दिवसाला वगळून पुढचा आणखी एक दिवस. म्हणजे एखाद्याने सोमवारी शेअर खरेदी केला तर तो मंगळवारी दिवसाअखेर त्याच्या डीमॅट अकाऊंटमध्ये जमा झालेला दिसेल. जर मंगळवारी सुट्टी असेल तर मग तो बुधवारी होईल. सध्या आपल्या देशात t+1 ट्रेडिंग सायकल लागू आहे. हे ट्रेडिंग सायकल t+0 करण्यासाठी सेक्यूरिटीज ...Read More