पुण्याच्या बाहेर, मुळशीच्या डोंगररांगांमध्ये एक शांत दरी होती. हिरवाईने नटलेली, पावसाळ्यात धुक्याच्या पडद्याने लपलेली, आणि उन्हाळ्यात जणू संपूर्ण जगापासून वेगळीच. त्या दरीच्या मध्यभागी, आधुनिक काचांच्या भिंतींनी झाकलेली, विशाल वैज्ञानिक प्रयोगशाळा उभी होती— "आर्या रिसर्च इन्स्टिट्यूट". ही प्रयोगशाळा भारत सरकारच्या एका गुप्त प्रकल्पाचा भाग होती, पण बाहेरील जगाला तिच्या अस्तित्वाची साधी कल्पनाही नव्हती. कुणी पाहिलं तर वाटायचं—ही एक साधी टेक्नॉलॉजी कंपनी आहे, एखाद्या मल्टिनॅशनलच्या मालकीची. पण आतमध्ये मात्र, भविष्याला धक्का देणारे प्रयोग चालू होते.
काळाचा कैदी - अध्याय 1
पहिला अध्याय-------------------------- अज्ञाताची दारं”-------------------------पुण्याच्या बाहेर, मुळशीच्या डोंगररांगांमध्ये एक शांत दरी होती. हिरवाईने नटलेली, पावसाळ्यात धुक्याच्या पडद्याने लपलेली, आणि उन्हाळ्यात संपूर्ण जगापासून वेगळीच. त्या दरीच्या मध्यभागी, आधुनिक काचांच्या भिंतींनी झाकलेली, विशाल वैज्ञानिक प्रयोगशाळा उभी होती— आर्या रिसर्च इन्स्टिट्यूट .ही प्रयोगशाळा भारत सरकारच्या एका गुप्त प्रकल्पाचा भाग होती, पण बाहेरील जगाला तिच्या अस्तित्वाची साधी कल्पनाही नव्हती. कुणी पाहिलं तर वाटायचं—ही एक साधी टेक्नॉलॉजी कंपनी आहे, एखाद्या मल्टिनॅशनलच्या मालकीची. पण आतमध्ये मात्र, भविष्याला धक्का देणारे प्रयोग चालू होते.त्या प्रयोगशाळेत काम करणारा प्रमुख वैज्ञानिक म्हणजे डॉ. आर्यन देशमुख. आर्यन देशमुख वयाच्या चाळीशीत होता. उंच, सडपातळ, गव्हाळ वर्णाचा. डोळ्यांत नेहमी विचारांचे वादळ असायचे—कधी शांत समुद्रासारखे, तर ...Read More
काळाचा कैदी - अध्याय 2
दुसरा अध्याय-----------------"प्रतिध्वनी"-------------------आर्यन टेबलावर बसला.त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता...."हे काय होत? संदेश? की भ्रम? "पण आत खोलवर त्याला ठाऊक - हे भ्रम नव्हत. कुणीतरी....किंवा काहीतरी, त्याच्या प्रयोगाला प्रतिसाद देत होत....आर्यनचा श्वास अडखळला. तो पुन्हा एकदा स्क्रीनकडे पाहू लागला, पण ती आता पूर्णपणे सामान्य होती. फक्त सिस्टम डायग्नोस्टिक्स आणि स्टँडबाय मोडमधील नीटनेटके आलेख त्याला दिसत होते.पण त्या क्षणाची छाप त्याच्या मनावर कोरली गेली होती. ती धूसर आकृती... ते डोळे... आणि तो संदेश:"तू इथे नसावास."त्याने आपले हात पाहिले. ते अजूनही कापत होते. तो अजुनही तोच विचार करत होता. हा भावनिक प्रतिसंवाद नव्हता; हा एक शारीरिक अनुभव होता.मशीनने केवळ डेटा कॅप्चर केला ...Read More
काळाचा कैदी - अध्याय 3
तिसरा अध्याय-------------------"घाटातील सावल्या"-----------------------विश्रामबाग घाट. पुण्याच्या गर्दीत दडलेले एक ओस पडलेले, विस्मृतीच्या धुक्यात हरवलेले ठिकाण. जुन्या विटा, कोसळणाऱ्या कठड्यांवरची शेवाळची हिरवट अंधुक पसरलेली होती. इतिहासाचा एक सन्नाट अतिशय शांत कोना होता.आर्यन त्याच्या SUV मधून बाहेर पडला. त्याने जीन्स आणि एक डार्क जॅकेट घातल होत, पाकिटात तो जुना नकाशा दाबून ठेवला होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते.क. व. म. म्हणजे काय? ते कोण आहे? आणि त्यांनी त्याला इथे का बोलावले?इतक्यात त्याचा फोन वाजला. तन्वी होती."दादा, तू कुठे आहेस? बाबा-आई आले आहेत. तू खरंच त्या समीकरणासाठी बाहेर गेलास का?"तिच्या आवाजात चीड आणि काळजी होती."हो,तनू. मला... मला इन्स्टिट्यूटसाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट एका ...Read More