कोकण प्रवास मालिका

(0)
  • 741
  • 0
  • 249

ही काही पहिली वेळ नव्हती. पण दरवेळी कोकणात जाणं म्हणजे नव्याने श्वास घेणं असतं. जणू काळजाच्या आत कुठेतरी दडलेलं घर... मातीचा वास, आंब्याचा मोहर, आणि आजीचा हात – या तिघांनी मनात खोलवर घर केलंय. प्रवासाची पूर्वतयारी ऑफिसमध्ये सुट्टी मंजूर झाली आणि पहिल्या संध्याकाळपासून मन गावाकडे धावत होतं. सहकार कॉलनीच्या गॅलरीत उभं राहून पावसाच्या थेंबांकडे पाहत होतो. अचानक एक थेंब हातावर पडला... आणि आठवण आली – कोलपेच्या माळरानावरून धावताना अंगावर पडणाऱ्या मोत्यांसारख्या थेंबांची. तयारी झाली होती – एक छोटा बॅग, एक पावसाळी जॅकेट, आणि कोकणाची माती मनात भरून. Konkan Kanya Express डोंबिवलीला थांबत नाही हे माहीत होतं, म्हणून ठाण्याचा प्लॅन केला. दुपारीच लोकलनं ठाणे गाठलं. तिथलं रात्रीचं स्टेशन – दिव्यांनी उजळलेलं, धावत पळत जाणारी माणसं, आणि त्या सगळ्यांत शांत उभा मी.

1

कोकण प्रवास मालिका - भाग 1

मी पुन्हा कोकणाला जातोय...-ही काही पहिली वेळ नव्हती. पण दरवेळी कोकणात जाणं म्हणजे नव्याने श्वास घेणं असतं. जणू काळजाच्या कुठेतरी दडलेलं घर... मातीचा वास, आंब्याचा मोहर, आणि आजीचा हात – या तिघांनी मनात खोलवर घर केलंय.प्रवासाची पूर्वतयारीऑफिसमध्ये सुट्टी मंजूर झाली आणि पहिल्या संध्याकाळपासून मन गावाकडे धावत होतं. सहकार कॉलनीच्या गॅलरीत उभं राहून पावसाच्या थेंबांकडे पाहत होतो. अचानक एक थेंब हातावर पडला... आणि आठवण आली – कोलपेच्या माळरानावरून धावताना अंगावर पडणाऱ्या मोत्यांसारख्या थेंबांची.तयारी झाली होती – एक छोटा बॅग, एक पावसाळी जॅकेट, आणि कोकणाची माती मनात भरून. Konkan Kanya Express डोंबिवलीला थांबत नाही हे माहीत होतं, म्हणून ठाण्याचा प्लॅन केला. ...Read More