कृतांत

(0)
  • 7.4k
  • 0
  • 3.5k

शके १४६०सगळीकडे निरव शांतता होती. काळोख साऱ्या जगावर अधिराज्य गाजवत होता. अश्यावेळी एका घनदाट जंगलात झाडांच्या गर्दीत मशालींच्या पिवळ्या प्रकाशात काही गुप्त हालचाली सुरू होत्या. काळा वेष परिधान केलेले आठजण वर्तुळाकार बसले होते. मध्यभागी लाकडाची धूनी पेटवली होती.ओबड धोबड विचीत्र अश्या दगडी मुर्त्यांच्यी मांडणीकेली होती. काही मानवी खोपड्यांमध्ये कसलातरी द्रव भरून ठेवला होता.धूनीच्या बाजूला एका दगडावर एक जिवंत घुबड बसलं होत. मशालींच्या पिवळ्या प्रकाशात त्याचे निळसर - हिरवट डोळे चकाकत होते.ते घुबड एकदम निच्छल बसले होते. धुनीच्या पलीकडे जमिनीवर एका शव ठेवले होते.

1

कृतांत - भाग 1

कृतांत (भाग १)शके १४६०सगळीकडे निरव शांतता होती. काळोख साऱ्या जगावर अधिराज्य गाजवत होता. अश्यावेळी एका घनदाट जंगलात झाडांच्या गर्दीत पिवळ्या प्रकाशात काही गुप्त हालचाली सुरू होत्या. काळा वेष परिधान केलेले आठजणवर्तुळाकार बसले होते. मध्यभागी लाकडाची धूनी पेटवली होती.ओबड धोबड विचीत्र अश्या दगडी मुर्त्यांच्यी मांडणीकेली होती. काही मानवी खोपड्यांमध्ये कसलातरी द्रव भरून ठेवला होता.धूनीच्या बाजूला एका दगडावर एक जिवंत घुबड बसलं होत. मशालींच्या पिवळ्या प्रकाशात त्याचे निळसर - हिरवट डोळे चकाकत होते.ते घुबड एकदम निच्छल बसले होते. धुनीच्या पलीकडे जमिनीवर एका शव ठेवले होते.काही प्रहरांपूर्वी तो मृत झाला होता. त्याला ठेवलेल्या जमिनी भोवताली वटवाघूळच्या रक्ताने विविध चिन्हे व मंत्र लिहिले ...Read More

2

कृतांत - भाग 2

कृतांत भाग २गौरी आश्चर्यचकित होत राजकडे पाहू लागली. तिच्या कल्पनेप्रमाणे एवड्या भाषा शिकलेला माणूस साठ एक वर्षाचा केस पिकलेला असावा पण समोर तर नुकतीच मिसरूड फुटलेला तिच्याच वयाचा तरूण होता.' मला वाटल कुणीतरी पत्रकार सांगाड्याच नेमक काय झाल त्याचा शोध घ्यायला आला असेल." गौरी म्हणाली." सांगाडे? कसले ?कुणाचे? म्हणजे मला सांगाड्यासोबत काम कराव लागणार?"राज घाबरून म्हणाला." किती घाबरट आहेस तू! खरच तू प्राचिन लिपी वाचतोस? मला शंका आहे." गौरी त्याला हिणवत म्हणाली." हे बघा मी माझ काम कस करायच ते तुम्ही सांगू नका.चला मला त्या वस्तू व लेख दाखवा."" आत्ता? ताबोडतोब? जरा विश्रांती घे."पण राज ऐकेना.अखेर गौरी त्याला घेवून ...Read More

3

कृतांत - भाग 3

कृतांत भाग३षटकोनी आकाराच्या या मैदानात एक पन्नास वर्षांचा प्रौढ इसम गुडघ्यांवर बसून रडत रडत दयेची भीक मागत होता.सभोवार असंख्य बसले होते. मैदानाच्या पूर्वेकडच्या सज्जात एक अत्याधिक सुंदर युवती बसली होती. सौंदर्यांची व्याखा तिला बघूनच सुचली असावी एवढी ती सुंदर होती.ती सुंदरी दुसरी तिसरी कुणी नसून ती अचलापूरची राजकन्या गौरी वर्मन होती.ती जेवढी सुंदर होती तेवढीच ती क्रूर व निर्दयी होती.सारी प्रजा तिचं नाव ऐकलं तरी थरथर कापायची. कोणाला कोणत्याही कारणांसाठी ती अमानुष शिक्षा करायची. तिच्यासाठी तो एक खेळ होता. एखादी व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत बघणे तिला आवडायचं.अश्यावेळी ती खदाखदा हसायची.आत्ता जी व्यक्ती ...Read More

4

कृतांत - भाग 4

कृतांत त्या रात्री राजकन्या गौरीला झोप येईना.सतत डोळ्यासमोर आयुषचा चेहरा...त्याच निर्भीड बोलणे...त्याच धाडस व राज्याप्रती असलेले प्रेम येत बरोबर आजपर्यंत आपण मस्तीत वागलो.प्रजेला कस्पटासमान मानले याचीही तिला जाणीव झाली होती.पण सध्या राज्य संकटात आहे.सारे शाक्त उठाव करून राज्य ताब्यात घेऊ शकतात आणि त्यांना साथ खुद्द महाराणी व आपल्या मामाची आहे हे एकूण तिला धक्का बसला होता. स्वतःच्या वडिलांना सावध करावे तर ते अघोऱ्यांच्या मायाजालात पुरते फसले होते. आपण नेमके काय करावे ते तिला समजत नव्हते.आयुष जे काही करु इच्छित होता त्यात त्याला साथ देणे गरजेचे वाटत होते.दुष्टांच्या हाती राज्य जाण्यापेक्षा ते योग्य माणसाकडे गेले तर प्रजेचे कल्याण होणार ...Read More