परटाची अनशी तिच्या पोराला सखारामाला घेवून माहेरी चवान वाडीला जायला बाहेर पडली. चार सालामागे तिचा घोव मेल्यापासून तिला भावांचा मोठा उपराळा होता. मळ्यात तिच्या निर्वाहापुरती जमिन होती. शेतीच्या टायमाला उखळदुरा करून पायली भात नी दोन शेर नाचण्याचापेरा ती मजुरीची जोतं लावून करून घेई. दाड(भाताची रोपे) वीत भर झाली की माहेराहून तिचे भाऊ चार जोतं नी गडी पैरी धाडीत. आलेले जोतये नी पैरी दोन तीन दिवस आगरेवाडीत थांबून तिची लावणी पुरी करून देत. भात कापणी झाल्यावर मळ्यात कुळीथ, चवळी, कडवे, वरणे अशी कडदणं (कडधान्यं) पेरीत त्या टायमालाही माहेरचे जोतये येवून दोन दिवसात उखळ काढून कडदणाची पेरणी करूनदेत. भातं कापून झाली तशी कडदण पेरायची वर्दी द्यायला अनशी माहेरी निघाली होती. माहेरी वीस बावीस माणसांच मोठं कुटुंब. अनशीच्या आठ कोंबड्या रोवणीवर बसलेल्या, त्यांची चार दिवसांची अंडी साठवून ती टोपलीत शाबूत रहाण्यासाठी प्रत्येक थराला भाताची करलं ( टरफलं) टाकून त्यावर दोन तोवशी ठेवून टोपली सख्याच्या डोईवर चढवून अनशी भिणभिणताना बाहेर पडली.

1

चकवा - भाग 1

चकवा भाग 1 परटाची अनशी तिच्या पोराला सखारामाला घेवून माहेरी चवान वाडीला जायला बाहेर पडली. चार सालामागे तिचा मेल्यापासून तिला भावांचा मोठा उपराळाहोता. मळ्यात तिच्या निर्वाहापुरती जमिन होती. शेतीच्या टायमाला उखळदुरा करून पायली भात नी दोन शेर नाचण्याचापेरा ती मजुरीची जोतं लावून करून घेई. दाड(भाताची रोपे) वीत भर झाली की माहेराहून तिचे भाऊ चार जोतं नी गडी पैरी धाडीत. आलेले जोतये नी पैरी दोन तीन दिवस आगरेवाडीत थांबून तिची लावणी पुरी करून देत. भात कापणी झाल्यावर मळ्यात कुळी ...Read More