कर्म - गीतारहस्य

(11)
  • 15.2k
  • 0
  • 8.7k

गीतारहस्या मधील कर्म या विषयावरील विचार सांगणे हा उद्देश आहे. हे अर्जुना, कर्मे न सोडताही तू कर्मबंध सोडशील अशी ही कर्मयोगातील बुद्धि म्हणजे ज्ञान तुला सांगतो. ज्ञानप्राप्ती नंतर निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हाच पुरुषार्थ. कर्मयोग मार्गात एका जन्मात सिद्धि मिळाली नाही तरी ते कर्म पुढील जन्मात उपयोगी पडते व अखेर सद्गती मिळते. बुद्धि हा शब्द ज्ञान, समजूत, हेतू, वासना या अर्थाने वापरला गेला आहे. तसाचं व्यवसाय म्हणजेच कार्याचा निश्चय करणारे बुद्धिंद्रिय असाही अर्थ होतो. बुद्धि स्थिर नसल्याने निरनिराळ्या वासनांनी मन व्यापले जाऊन, स्वर्गप्राप्तीसाठी अमुक कर्म, पुत्र प्राप्ती साठी अमुक कर्म असे मनुष्य करू लागतो. परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करून न घेता कर्म करणाऱ्यास, कर्माचे फल मिळाले तरी मोक्ष मिळत नाही. मोक्ष मिळवण्यासाठी बुद्धिंद्रिय स्थिर असले पाहिजे.

1

कर्म - गीतारहस्य - 1

कर्म . गीता रहस्य.गीतारहस्या मधील कर्म या विषयावरील विचार सांगणे हा उद्देश आहे.हे अर्जुना, कर्मे न सोडताही तू सोडशील अशी ही कर्मयोगातील बुद्धि म्हणजे ज्ञान तुला सांगतो.ज्ञानप्राप्ती नंतर निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हाच पुरुषार्थ. कर्मयोग मार्गात एका जन्मात सिद्धि मिळाली नाही तरी ते कर्म पुढील जन्मात उपयोगी पडते व अखेर सद्गती मिळते.बुद्धि हा शब्द ज्ञान, समजूत, हेतू, वासना या अर्थाने वापरला गेला आहे. तसाचं व्यवसाय म्हणजेच कार्याचा निश्चय करणारे बुद्धिंद्रिय असाही अर्थ होतो. बुद्धि स्थिर नसल्याने निरनिराळ्या वासनांनी मन व्यापले जाऊन, स्वर्गप्राप्तीसाठी अमुक कर्म, पुत्र प्राप्ती साठी अमुक कर्म असे मनुष्य करू लागतो.परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करून न ...Read More

2

कर्म - गीतारहस्य - 2

"कर्म- गीतारहस्य"गीतारहस्य हा ग्रंथ गीतेतील कर्मयोगाचे महत्व स्पष्ट करतो.कर्मयोगाच्या साधनेसाठी आवश्यक असलेल्या निःसंग व ब्रह्मनिष्ठ स्थितीची प्राप्ती कोणत्या साधनांद्वारे ते आता सांगितले आहे. मनात फलाशा न ठेवता जो आपली नेमून दिलेली कर्मे करतो, तोच खरा संन्यासी आणि कर्मयोगी समजावा. ज्याला संन्यास म्हणतात तोच कर्म योग समजावा कारण काम्यबुद्धीरुप फलाशेचा त्याग (संन्यास) केल्याशिवाय कोणीही कर्मयोगी होत नाही.साधनेच्या पहिल्या अवस्थेत कर्म हेच योगसिद्धीचे कारण बनते.कर्मयोगी आपली सर्व कर्मे शांतचित्ताने, कर्तव्य म्हणून, फळाशा न ठेवता करतो.अशा प्रकारे फळाशेचा त्याग करणारा मनुष्यच खरा संन्यासी आणि योगारूढ मानला जातो.प्रयत्नशील मनुष्यांसाठी फळाशेचा त्याग करून कर्मयोगाची साधना शक्य होते.मनुष्याने स्वतःच आपला उद्धार करावा, कारण आपणच आपले ...Read More

3

कर्म - गीतारहस्य - 3

"कर्म ". गीता रहस्य.ज्ञानानें आणि श्रद्धेनें, पण त्यांतल्या त्यांतहि विशेषेकरून भक्तीच्या सुलभ राजमार्गानें, बुद्धि होईल तितकी सम करून प्रत्येकानें संग्रहार्थ स्वधर्माप्रमाणें आपआपलीं कर्मे निष्काम बुद्धीनें आमरणान्त करीत रहाणें हेंच त्याचे परम कर्तव्य असून, त्यांतच त्याचे इहलौकिक व पारलौकिक कल्याण आहे, मोक्षप्राप्तीसाठीं कर्मे सोडण्याची किंवा दुसरें कोणतेंहि अनुष्ठान करण्याची जरूर नाहीं, हा सर्व गीताशास्त्राचा फलितार्थ होय. -लोकमान्य टिळक.ज्ञानी पुरुषांनी लोकांना ज्ञान देऊन शहाणे करावे.लोकांना सदाचरणाची सवय लागलेली नसते , त्यांना ज्ञान झाल्यानंतर ते आपल्या गैरवर्तनाच्या समर्थनार्थ त्याचा उपयोग करतात. ज्ञानी पुरुषांनी आपण स्वतः संसारात राहून लोकांना निष्काम कर्माचा म्हणजे सदाचरणाचा धडा घालून देऊन त्याप्रमाणे त्यांच्याकडून आचरण करून घेणे हे त्यांचे ...Read More

4

कर्म - गीतारहस्य - 4

कर्म -गीतारहस्यअहंकार, दंभ सुटणे ,अनासक्ती, सम बुद्धि (इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झाले तरी शांत राहणे), बाष्कळ बडबड न करणे अध्यात्मज्ञान नित्य आहे हे लक्षात ठेवणे, तत्वाप्रमाणे वागणे, मनोनिग्रह, गुरु सेवा, इत्यादी गुण मनुष्यामध्ये दिसू लागणे यालाच ज्ञान म्हणावे.कार्य म्हणजे शरीर कारण म्हणजे इंद्रिये आणि प्रकृती.गुण हे करवून घेणारे आणि हे करणारा जो, तो सुखदुःखाचा उपभोग घेणारा पुरुष म्हणजेच क्षेत्रज्ञ.कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडूनच केली जातात. आत्मा अकर्ता आहे हे जाणणे व विविधतेमध्ये एकता दिसणे व या एकापासूनच सर्व विस्तार झाला आहे असे समजू लागणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती.चांगले कर्म करणे हे सत्वगुणाचे लक्षण आहे पण हे करण्याची प्रवृत्ती होणे हा रजोगुणाचा धर्म ...Read More