लग्नाची गोष्ट

(4)
  • 27.5k
  • 0
  • 17.6k

मी बी एस्सी च्या दुसऱ्या वर्षाला शिकत असतानाच काही कौटुंबिक कारणामुळे माझ्यावर नोकरी शोधायची वेळ आली. खरं तर अशा अर्धवट शिक्षणावर नोकरी मिळणे दुरापास्त होते,पण त्याला पर्याय नव्हता.माझे मॅट्रिक आणि बारावीचे मार्क्स बरे असल्यामुळे त्या मार्कांचा विचार होईल अशीच एखादी नोकरी मी शोधू लागलो.. माझ्या नशिबाने काही दिवसांतच माझ्या वाचनात टेलिफोन खात्याची जाहिरात आली.मी तेथे अर्ज केला आणि निवडीसाठीची परीक्षा दिली. सर्व सोपस्कार होऊन मला टेलिफोन खात्यात नोकरी मिळाली. प्रशिक्षण पूर्ण करून मी नोकरीत रुजू झालो.ही नोकरी करता करता माझे बी. एस्सी. पर्यंत शिक्षणही मी पूर्ण केले. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मी येथपर्यंत पोहोचलो होतो.आता माझ्यावर असलेल्या कुटूंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. महत्वाचे म्हणजे सावकाराकडे गहाण पडलेली गावाकडची जमिन सोडवायची होती,गावाकडे दोन खणाचे का होईना साधेसे घर बांधायचे होते, पडत्या काळात अनेकांनी काही ना काही मदत केली होती,त्यांचे जमेल तेव्हढे उतराई व्हायचे होते,त्यामुळे लगेच लग्न वगैरे विषय माझ्या मनात मुळीच नव्हता.

Full Novel

1

लग्नाची गोष्ट - भाग 1

लग्नाची गोष्ट भाग १. मी बी एस्सी च्या दुसऱ्या वर्षाला शिकत असतानाच काही कौटुंबिक कारणामुळे माझ्यावर नोकरी शोधायची वेळ खरं तर अशा अर्धवट शिक्षणावर नोकरी मिळणे दुरापास्त होते,पण त्याला पर्याय नव्हता.माझे मॅट्रिक आणि बारावीचे मार्क्स बरे असल्यामुळे त्या मार्कांचा विचार होईल अशीच एखादी नोकरी मी शोधू लागलो.. माझ्या नशिबाने काही दिवसांतच माझ्या वाचनात टेलिफोन खात्याची जाहिरात आली.मी तेथे अर्ज केला आणि निवडीसाठीची परीक्षा दिली. सर्व सोपस्कार होऊन मला टेलिफोन खात्यात नोकरी मिळाली. प्रशिक्षण पूर्ण करून मी नोकरीत रुजू झालो.ही नोकरी करता करता माझे बी. एस्सी. पर्यंत शिक्षणही मी पूर्ण केले. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मी येथपर्यंत पोहोचलो होतो.आता माझ्यावर ...Read More

2

लग्नाची गोष्ट - भाग 2

लग्नाची गोष्ट भाग २ मी पुण्यात जेथे रहात होतो त्याच गल्लीत एक बाई रहायच्या. त्यांचा मुलगा माझ्याच वयाचा होता. त्याच्याशी मैत्रीही होती. तर,या मावशी एका शनिवारी संध्याकाळी खास माझ्याकडे आल्या. त्यांनी सहज विचारल्यासारखे दाखवत माझा रविवारचा कुठे जायचा कार्यक्रम आहे का विचारले."मी घरीच आहे", म्हटल्यावर त्या म्हणाल्या...." अरे बरे झाले, उद्या माझ्याबरोबर चल दत्तवाडीला! माझ्या भावाला तुमच्या गावाकडच्या कुणाची तरी माहीती पाहीजे आहे! त्याला मी तुझे तेच गाव आहे हे सांगितले तर त्याने रविवारी तुला घेऊन यायलाच सांगितले!"खरे तर मावशींच्या त्या भावाला ना मी कधी बघितले होते, ना त्याने मला! पण असेल काही काम, असा विचार करून रविवारी तिकडे ...Read More

3

लग्नाची गोष्ट - भाग 3

लग्नाची गोष्ट भाग ३ मी नोकरीत हळूहळू रुळत होतो.माझ्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत होतो,पण तुटपुंज्या पगारात काही करू शकत नव्हतो. पुण्यातल्या भावाच्या घरी राहून मी फार काही करू शकेल असे आता वाटतं नव्हते.आता मी पंचविशी पार केली होती.एवढ्यात लग्न करावे की नको या बाबतीत द्विधा मनस्थिती होती. कधीकाळी लग्न करायचे झाले तर नोकरी करणारी पत्नी शोधायची हे मात्र मनाशी ठरवून ठेवले होते. अर्थात माझी कौटुंबिक पार्श्वभूमी व माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेता मला लग्नासाठी अशी मुलगी मिळणे दुरापास्त होते.मी नोकरीला लागल्यावर स्वतःच्या आणि कुटुंबासाठी काही गोष्टी ठरवल्या होत्या,पण ठरवल्याप्रमाणे एकही गोष्ट घडत नव्हती त्यामुळे त्या काळात ...Read More

4

लग्नाची गोष्ट - भाग 4

लग्नाची गोष्ट भाग ४ माझ लग्न ठरलं लग्नपत्रिकाही छापून आल्या. निमंत्रण करायला सुरूवात करायची होती.त्यावेळी मी पुण्यात नागपूर चाळीत रहायचो. मी असा विचार केला की ज्या वस्तीत आपण इतके दिवस रहातोय, जिथे राहून आपण शिकता शिकता नोकरी मिळवली,आपल्या वाईट काळात ज्या वस्तीने आधार दिला तेथील प्रतिष्ठीत व्यक्तींना आपण प्रथम निमंत्रण पत्रिका देवू या! या वस्तीत आमच्या छत्रपती शिवाजी मंडळाने साईबाबा मंदिर बांधले होते. या साईं मंदिराचा मी सुरूवातीपासून क्रियाशील सदस्य होतो. सर्वप्रथम मी बाबांच्या मुर्तीसमोर लग्नपत्रिका ठेवली. साईबाबाना मनोभावे नमस्कार करून पत्रिका देण्यासाठी पहीली व्यक्ती निवडली- श्रीयुत गाडेवकील! या वकील साहेबांचे आणि माझी जरी फक्त तोंडओळख होती तरी कधी ...Read More

5

लग्नाची गोष्ट - भाग 5

लग्नाची गोष्ट भाग ५ एकोणीसशे पंचाऐंशी फेब्रुवारीत माझे लग्न ठरले.माझी जरी सरकारी नोकरी होती तरी घरच्या जबाबदाऱ्या अंगावर असल्याने करुन संसार थाटण्याइतपत अजून मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला नव्हतो.खरं तर अजूनही माझे बँकेत अकाऊंटही नव्हते. आमच्या ऑफिसच्या पी अँड टी सोसायटीचे कर्ज अधिक माझ्या नियोजित पत्नीच्या ऑफिसच्या पतपेढीचे लग्नाआधीच कर्ज घेऊन कशीबशी मी लग्नाच्या खर्चाची तजवीज केली होती. १६ मे ही लग्नाची तारीख ठरली,पण काही कारणाने माझ्या घरातून एक वेळ आर्थिक मदत सोडा,पण लग्नाच्या तयारीसाठीही म्हणावे तसे सहकार्य नव्हते. निमंत्रणपत्रिका वाटणे,गावाकडून वऱ्हाड आणण्यासाठी ट्रक ठरवणे,रितीप्रमाणे भावकीची बैठक, लग्नसमारंभाचे बारीकसारीक नियोजन अशा गोष्टी माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री उशीरपर्यंत बाळू नितननवरे या ...Read More