कर्ण

(9)
  • 17.5k
  • 0
  • 10.6k

एक आज मला थोडं बोलायचं आहे! मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील! म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली? पण केव्हा-केव्हा अशांनाही बोलावं लागतं! जेव्हा-जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा-तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे! मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही; कारण मला चांगलं माहीत आहे की, तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून! आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता! अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता!! आज मला माझ्या आयुष्‍याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावयाचा आहे!

1

कर्ण - भाग 1

एक आज मला थोडं बोलायचं आहे! मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील! म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली? पण अशांनाही बोलावं लागतं! जेव्हा-जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा-तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे! मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही; कारण मला चांगलं माहीत आहे की, तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून! आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता! अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता!! आज मला माझ्या आयुष्‍याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट ...Read More

2

कर्ण - भाग 2

लतावृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर! चकोर, चातक, कोकीळ, भारद्वाज आणि सारंग असंख्य पक्षिराजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागं होणारं, गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं, दोन प्रहराच्या रणरणत्यावेळी कदंबाच्या गर्द-गर्द गार छायेत निवांतपणे विसावणारं, घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद-मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं, इथं - या चंपानगरीत - माझं ते रम्य बालपण गेलं! हो, अक्षरश: गेलंच. धनुष्‍यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं ...Read More