वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा

(8)
  • 7.7k
  • 0
  • 3.1k

आजच्या युगात कोण कुणाशी आपल्या फायद्यासाठी कसा संबंध जोडेल ते सांगता येत नाही. अगदी ओढून-ताणून असे नातेसंबंध तयार करतात की, ज्यामुळे आपले काम पार पडेल. अशा ओढून ताणून आणलेल्या संबंधांना 'बादरायण संबंध' म्हणतात. ह्या म्हणीशी निगडित एक मजेदार कथा आहे. एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहात होता. त्याच्या घरी लग्नकार्य होते. त्या निमित्ताने असंख्य पाहुणे मंडळी घरी जमली होती. अनेक परिचित येत-जात होते. त्या व्यापाऱ्याचे व त्याच्या घरातील मंडळींचे अनेक मित्रमंडळी होते. अगदी लग्नाच्या दिवशी एक बैलगाडी त्यांच्या घरासमोर थांबली. गाडीवान खाली उतरला. त्याने बैल मोकळे केले. तिथल्या बोरीच्या झाडाला बांधले. गाडीही व्यवस्थित झाडाखाली ठेवली. कुण्या पाहुण्याचे आगमन झाल्याचे पाहून तो अगत्यशील व्यापारी धावत बाहेर आला. त्याने गाडीवानाचे स्वागत केले. तसेच बैलांना चारा-पाणी देण्याची व्यवस्था आपल्या नोकरांना सांगून केली. गाडीवान पाहुण्याची राहण्याची व्यवस्था केली. हा नवा पाहुणा चांगला दोन दिवस राहिला.

1

वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1

वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा : भाग 1आजच्या युगात कोण कुणाशी आपल्या फायद्यासाठी कसा संबंध जोडेल ते सांगता नाही. अगदी ओढून-ताणून असे नातेसंबंध तयार करतात की, ज्यामुळे आपले काम पार पडेल. अशा ओढून ताणून आणलेल्या संबंधांना 'बादरायण संबंध' म्हणतात. ह्या म्हणीशी निगडित एक मजेदार कथा आहे.एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहात होता. त्याच्या घरी लग्नकार्य होते. त्या निमित्ताने असंख्य पाहुणे मंडळी घरी जमली होती. अनेक परिचित येत-जात होते. त्या व्यापाऱ्याचे व त्याच्या घरातील मंडळींचे अनेक मित्रमंडळी होते. अगदी लग्नाच्या दिवशी एक बैलगाडी त्यांच्या घरासमोर थांबली. गाडीवान खाली उतरला. त्याने बैल मोकळे केले. तिथल्या बोरीच्या झाडाला बांधले. गाडीही व्यवस्थित ...Read More