प्रीत तुझी माझी.. पर्व -१

(12)
  • 30.2k
  • 4
  • 15.5k

नयना आणि विशाल दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. कॉलेजपासून दोघेही एकत्र होते. अभ्यास असो, कॉलेजच्या सहली किंवा वार्षिक स्नेहसंमेलन, काहीही असो दोघे नेहमी एकत्रच असायचे. दोघांमध्ये एक वेगळच बॉंडिग तयार झालं होतं. हळूहळू नकळतच मैत्रीच रुपांतर कधीतरी प्रेमात होत गेलं. खरंतर दोघंही एकमेकांना खूप आवडत तर होते पण स्वताःहून बोलायला कोणीच तयार नव्हते. त्याला उगाचंच वाटायचं की, तिला आपल्या मनातला सारं समजलं तर ती दोघांत असलेली मैत्री सुध्दा तोडून टाकेन. आणि इकडे तिला वाटायचा की मी स्वतःहून विचारलं तर तो म्हणेल की आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत. उगाचच कहीसा गैरसमज होईल दोघांमध्ये. दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते. पण बोलायला मात्र कुणीच तयार नव्हते. रोजच समोर यायचे, बोलायचे, पण फक्त मैत्रीच्या नात्याने. मनात चाललेली ती अनामिक हुरहुर मनातच सलत होती. मनात विचारांचं काहूर तर माजत होतं पण बोलायचं धाडस दोघांपैकी कुणातच नव्हतं. दिवसेंदिवस दोघेही एकमेकांत चांगलेच गुंतत चालले होते.

Full Novel

1

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : १)

नयना आणि विशाल दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. कॉलेजपासून दोघेही एकत्र होते. अभ्यास असो, कॉलेजच्या सहली किंवा वार्षिक काहीही असो दोघे नेहमी एकत्रच असायचे. दोघांमध्ये एक वेगळच बॉंडिग तयार झालं होतं. हळूहळू नकळतच मैत्रीच रुपांतर कधीतरी प्रेमात होत गेलं. खरंतर दोघंही एकमेकांना खूप आवडत तर होते पण स्वताःहून बोलायला कोणीच तयार नव्हते. त्याला उगाचंच वाटायचं की, तिला आपल्या मनातला सारं समजलं तर ती दोघांत असलेली मैत्री सुध्दा तोडून टाकेन. आणि इकडे तिला वाटायचा की मी स्वतःहून विचारलं तर तो म्हणेल की आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत. उगाचच कहीसा गैरसमज होईल दोघांमध्ये. दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते. ...Read More

2

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : २)

प्रीत तुझी माझी.. भाग - १ पासून पुढे.. सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी कथा पहिल्यांदाच वाचन करत असाल. तर या कथेचा आधीचा भाग नक्की वाचन करा. धन्यवाद ====================================== तेव्हा अचानकच मला काय झाले काय माहित ? मला अचानक खुप त्रास होऊ लागला. उलटी आल्यासारखे होत होते, पण उलटी काही होत नव्हती. मला जरा जरा कोरडा खोकला येत होता. मी लगेचच पर्समधून रूमाल बाहेर काढून माझ्या तोंडावर धरला. तोंडातून थोडेसे रक्त निघत होते. रक्त आता रूमालावर पण लागले होते. हा प्रकार बघून बाबा खूपच घाबरले. नेमकी आज आईसुध्दा घरी नव्हती. माझ्या आजीला बरं ...Read More

3

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ३)

प्रीत तुझी माझी भाग - २ पासून पुढे.. सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी कथेचा हा भाग पहिल्यांदाच वाचत असाल तर, या कथेचे आधीचे दोन भाग नक्की वाचा. धन्यवाद ====================================== आज निशांत पुण्यात येऊन बरोबर एक महिना झाला होता. अवघं चार वर्ष वय होत आलेला निशांत आमच्या घरात मात्र चांगलाच रमला होता. रोज बाबा त्याला बागेत फिरायला घेऊन जात होते. मग काय दररोज येताना या साहेबांना एक आईसक्रीम भेटायची. आई त्याला मागेल तो पदार्थ बनवून देत असे. मी बॅंकेतून घरी आले की त्याला चित्र काढायला शिकवत होते. कधीकधी चित्र चांगलं आलं तर माझ्याकडूनही ...Read More

4

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ४)

प्रीत तुझी माझी भाग - ३ पासून पुढे.. सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी कथेचा हा भाग पहिल्यांदाच वाचत असाल तर, या कथेचे आधीचे तीन भाग नक्की वाचा. धन्यवाद ====================================== नयना आज तिच्याच घरी थांबली होती. आराध्याला जसे समजले की आज निशांतचा बर्थडे आहे. तसं आपलं सारं आजारपण विसरून ती लगबगीने कामाला लागली. आईने तिला आत आराम करायला सांगितला पण तिने आजिबात ऐकले नाही. संध्याकाळी निशांतचा बर्थडे जोरात साजरा करण्यात आला. आराध्या खुप खुष होती. नयनाने विशालकडे पाहतच त्याला खुणावले. तसा विशाल उठला व फोटो काढण्याच्या निमित्ताने निखिलला आराध्या समोर घेऊन आला. काही ...Read More

5

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ५ अंतिम)

प्रीत तुझी माझी भाग - ४ पासून पुढे.. सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी कथेचा हा भाग पहिल्यांदाच वाचत असाल तर, या कथेचे आधीचे चार भाग नक्की वाचा. धन्यवाद ====================================== आता वेळ होती सप्तपदींची. समोर एका पाटावर एका ओळीत सात सुपाऱ्या थोडे तांदुळ ठेवून त्यावर ठेवलेल्या होत्या. बाजूला एका छोट्या होमकुंडात धगधगता अग्नी प्रज्वलित करून ठेवला होता. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांचा हात हातात धरला. आणि सप्तपदी सुरु झाल्या. ते जसे सप्तपदी चालत होते तसे गुरूजी त्या दोघांना प्रत्येक पाऊलांचा अर्थ समजावून सांगत होते. आणि प्रत्येक पावलानंतर तिला एक सुपारी तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने ...Read More