वल्डकप फायनल

(0)
  • 8.3k
  • 0
  • 3.6k

वल्डकप फायनल ही पुस्तक वाचकांपुढे देतांना मला नेहमीसारखाच आनंद होत आहे. ही एका कलाकाराला वाहिलेली पुस्तक असून यातील पात्र व कल्पना ह्या काल्पनीक आहेत. ही पुस्तक लिहिण्यामागं माझ्या कल्पनेत होता देशातील सैनिक. सैनिक हा देशासाठी लढतो. अन् लढता लढता एखाद्या गोळीनं तो अपंग होतो. मग तो लढू शकत नाही. त्याला पेन्शन सुरु होते व तो जगतो. मला युद्धभुमी दाखवायची होती व परिस्थितीही दाखवायची होती त्या सैनिकाची. मात्र ही पुस्तक लिहिण्यासाठी जी कल्पना केली होती. त्यात पेन्शन द्वारे मिळणारा पैसा आड आला. म्हणूनच मी या माझ्या पुस्तकात एक क्रिकेटर उभा केला. अशातच भारत वल्डकप फायनल हारला होता. तीच थीम मला पटली व साकार झालं वल्डकप फायनल नावाचं पुस्तक. ही माझी चौऱ्यांशिवी पुस्तक प्रकाशित होणारी पुस्तक असून छप्पनवी कादंबरी आहे. आतापर्यंत माझ्या अडतीस कादंबऱ्या ऑनलाईन झालेल्या असून माझं नाव जरी गुगलवर टाकलं तरी कादंबऱ्या उघडतात. त्यामुळं ई साहित्य प्रतिष्ठाणचं आभार. त्यांनी माझ्या पुस्तका ऑनलाईन केल्या.

1

वल्डकप फायनल - भाग १ व २

वल्डकप फायनल या पुस्तकाविषयी वल्डकप फायनल ही पुस्तक वाचकांपुढे देतांना मला नेहमीसारखाच आनंद होत आहे. ही एका कलाकाराला वाहिलेली असून यातील पात्र व कल्पना ह्या काल्पनीक आहेत. ही पुस्तक लिहिण्यामागं माझ्या कल्पनेत होता देशातील सैनिक. सैनिक हा देशासाठी लढतो. अन् लढता लढता एखाद्या गोळीनं तो अपंग होतो. मग तो लढू शकत नाही. त्याला पेन्शन सुरु होते व तो जगतो. मला युद्धभुमी दाखवायची होती व परिस्थितीही दाखवायची होती त्या सैनिकाची. मात्र ही पुस्तक लिहिण्यासाठी जी कल्पना केली होती. त्यात पेन्शन द्वारे मिळणारा पैसा आड आला. म्हणूनच मी या माझ्या पुस्तकात एक क्रिकेटर उभा केला. अशातच भारत वल्डकप फायनल हारला होता. ...Read More

2

वल्डकप फायनल - भाग ३

वल्डकप फायनल भाग ३ लिव्ह इन रिलेशनशीप हा कायदा विवाह न करणाऱ्या लोकांसाठी असावा. विवाहानंतरच्या लोकांसाठी नको. तसा कायद्यात व्हावा. अलिकडील वास्तविक परिस्थिती पाहता न्यायालयात घटस्फोटाची दाखल होणारी प्रकरणं जास्त आहेत व ती वाढतच आहेत. ही वाढत आहेत लिव्ह इन रिलेशनशीपच्या सरकारच्या कायद्यामुळे. तसं पाहता न्यायालयानंही इतर देशाप्रमाणे याही देशात लोकांना लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहण्याची मुभा दिलेली आहे. तसं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये देशात कोणत्याही वयातील स्री व पुरुषांना राहता येतं. त्यातच अशा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये लोकं आपले आपले विवाहाचे पती वा पत्नीच सोडून नाही तर चांगला रमलेला संसार सोडून राहतात. परंतु यानं संसार उध्वस्त होतो. विवाहाला फाटा फुटतो ...Read More