चोरीचे रहस्य

(24)
  • 51.7k
  • 1
  • 31k

उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विदर्भात माझ्या काकांच्या गावी गेलो होतो. काकांना दोन अपत्ये आहेत. माझा चुलतभाऊ माझ्याच वयाचा आहे आणि माझी चुलतबहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. तिचे लग्न झाले आहे, तिला एक मुलगा आहे. सुट्टीमध्ये ती पण मुलाला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे काकांकडे आली होती. रोज आमचा वेळ गप्पांमध्ये,आंबे,आईस्क्रिम, कुल्फ्या खाण्यात कसा जात असे कळतही नसे. त्या दिवशी असेच आम्ही सगळे आमरस-पुरी खाऊन दुपारी कुलर च्या गार हवेत झोपलो होतो. जेमतेम तासभर झाला असेल की मला काका-काकूंच्या बोलण्याच्या आवाजामुळे जाग आली. काकू,काकांना सांगत होती "अहो ऐकलं का! पांडे काकूंकडे चोरी झाली!" "ककाय!! कधी??",काका "अहो आत्ता भरदुपारी झाली. ते तासभरासाठी बाहेर गेले होते तेव्हा कशी कोण जाणे पण चोरी झाली.",काकू "आपण तर घरीच आहोत आपल्याला तर कोणी आलेलं दिसलं नाही किंवा काही आवाजही आला नाही.",काका "कुलर च्या आवाजात काही कळलं नसेल आपल्याला पण आश्चर्य आहे असं कसं काय कोणी एका तासात येऊन चोरी करून जाऊ शकते? चोराला कसं काय माहीत की ते बाहेर जाणार आहे म्हणून",काकू

Full Novel

1

चोरीचे रहस्य - भाग 1

उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विदर्भात माझ्या काकांच्या गावी गेलो होतो. काकांना दोन अपत्ये आहेत. माझा चुलतभाऊ माझ्याच वयाचा आहे आणि चुलतबहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. तिचे लग्न झाले आहे, तिला एक मुलगा आहे. सुट्टीमध्ये ती पण मुलाला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे काकांकडे आली होती. रोज आमचा वेळ गप्पांमध्ये,आंबे,आईस्क्रिम, कुल्फ्या खाण्यात कसा जात असे कळतही नसे. त्या दिवशी असेच आम्ही सगळे आमरस-पुरी खाऊन दुपारी कुलर च्या गार हवेत झोपलो होतो. जेमतेम तासभर झाला असेल की मला काका-काकूंच्या बोलण्याच्या आवाजामुळे जाग आली. काकू,काकांना सांगत होती "अहो ऐकलं का! पांडे काकूंकडे चोरी झाली!" "ककाय!! कधी??",काका "अहो आत्ता भरदुपारी झाली. ते तासभरासाठी बाहेर ...Read More

2

चोरीचे रहस्य - भाग 2

सगळ्या फ्लॅट्समधील सदस्य ग्राउंड फ्लोअर ला कॉमन एरिया मध्ये जमले होते. तिथे जाता जाता पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली. सगळ्यात त्यांनी फर्स्ट फ्लोअर वरच्या फ्लॅट पासून म्हणजे माझ्या काकांपासून सुरुवात केली. "आपलं नाव समजू शकेल का?",पोलीस "मी जयवंत कल्याणी! ",काका "तुम्ही कोणाला अपार्टमेंटमध्ये येताना जाताना बघितलं का ? कोणी संशयास्पद वगैरे?",पोलीस "नाही आम्ही घरात होतो आणि दुपारची उन्हाची वेळ असल्याने कुलर सुरू होता त्यामुळे काहीच आवाज आला नाही.",काका त्यानंतर त्यांनी 2nd फ्लोअर वरच्या श्री व सौ कुलकर्णींची चौकशी केली. "हो तुमचं बरोबर आहे नेहमी ते आमच्याकडे किल्ली ठेवतात पण आज काही त्यांनी किल्ली ठेवली नाही. आणि आम्ही कोणालाही वर येताना ...Read More

3

चोरीचे रहस्य - भाग 3

"मला ज्या महिलेने कपाट फोडायला सांगितलं त्यांनी मला त्यांचं नाव पांडे सांगितलं. त्या माझ्या दुकानात आल्या होत्या तेव्हा ह्या पत्ता देऊन तिसऱ्या मजल्यावर यायला सांगितलं होतं.",किल्लीवाला "मग तर तू त्या महिलेचे वर्णन करू शकशील",पोलीस "चेहरा तर मी ओळखू शकत नाही सर",किल्लीवाला "चेहरा का ओळखू शकत नाही तू?",पोलीस "कारण त्या महिलेने तोंडाला स्कार्फ डोळ्याला गॉगल आणि हातात gloves घातले होते.",किल्लीवाला "अच्छा मग साधारण उंची वगैरे सांगू शकतो?",पोलीस "उंची साधारण 5 फूट दोन इंच असेल एवढं सांगू शकतो.",किल्लीवाला "अच्छा! बरं मला सांग ती महिला एखाद्या वाहनावर आली होती की पायी पायी?",पोलीस "नाही ती महिला पायी पायीच आली होती",किल्लीवाला "चेहरा जरी ओळखता ...Read More

4

चोरीचे रहस्य - भाग 4

तो दिवस त्याच चर्चेत पार पडला. दुसऱ्यादिवशी सकाळी पोलीस आणखी एका माणसाला घेऊन आले. आणि त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या कॉमन एरिया मध्ये बोलावले. "हा बघा तुम्ही वर्णन केल्यानुसार हा व्यक्ती आम्हाला सापडला पण हा कुरिअर बॉय नसून इथून जवळच काही अंतरावर असलेल्या चौकात पाणीपुरी गाडी चालवतो. हाच आहे न तो?",पोलीस भाले काकूंना म्हणाले. "काय माहीत ? मी त्या दिवशी ओझरता बघितला होता. साधारण असाच होता.",भाले काकू "हाच असेल तो पाणीपुरी च्या आड लक्ष ठेवत असेल आणि मग कुरिअर बॉय म्हणून चोरी करत असेल! काय रे बरोबर बोलतो न मी",पोलीस त्या माणसाचा हात पिरघळत म्हणाले. "मेलो मेलो साहेब हात तुटेल ...Read More

5

चोरीचे रहस्य - भाग 5 - (अंतिम)

कुलकर्णी काकूंनी दार उघडलं. "काकू तुमच्यासाठी माझ्या काकूंनी हे भोकराचं लोणचं पाठवलं,तुम्हाला आवडते नं ", मी म्हणालो. "हो हो अरे ये नं बस ,अरे व्वा हा चिंटू पण आलाय वाटतं तुझ्यासोबत",कुलकर्णी काकू चिंटु कडे कौतुकाने बघत म्हणाल्या. थोड्या गप्पा झाल्यावर चिंटूने मला कानात सांगितलं तसा मी थोडं मोठ्याने त्याला म्हणालो,"अरे ,थोडं थांब बाजूलाच तर घर आहे आपलं ,येईल आई किंवा आजी बाहेर " "का,काय झालं ,काय म्हणतो चिंटू ?",कुलकर्णी काकू "काही नाही त्याला टॉयलेट ला जायचं आहे पण आमच्या कडचे दोन्ही बाथरूम्स व्यस्त आहेत म्हणून त्याला म्हंटल थांब थोडं ",मी "अरे,त्यात काय,जाऊ दे न त्याला आमच्या कडच्या बाथरूममध्ये",कुलकर्णी काकू ...Read More