मर्डर वेपन

(36)
  • 94.2k
  • 3
  • 54.1k

“आपल्या ऑफिसात एक विचित्र अशी स्त्री तुमची वाट बघत बसल्ये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ तिचं म्हणणं आहे की तिला धोका आहे आणि तुमचं संरक्षण हवाय तिला.जोडीने तुमचा सल्ला आणि तुमच्या विश्वासातल्या एखाद्या चांगल्या गुप्तहेराची मदत.” “ कोण आहे ती? आणि कुठे आहे अत्ता?” पाणिनीनं विचारलं “ तिचं नाव आहे रती रायबागी, पण तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे.” –सौंम्या पाणिनीने आश्चर्याने भुवया उंचावल्या. “ मी साडेबाराला जेवायला बाहेर गेले, जातांना आपल्या रिसेप्शनिस्ट गती ला सांगून गेले होते.मी बा

Full Novel

1

मर्डर वेपन - प्रकरण 1

मर्डर वेपन प्रकरण १ “आपल्या ऑफिसात एक विचित्र अशी स्त्री तुमची वाट बघत बसल्ये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ तिचं आहे की तिला धोका आहे आणि तुमचं संरक्षण हवाय तिला.जोडीने तुमचा सल्ला आणि तुमच्या विश्वासातल्या एखाद्या चांगल्या गुप्तहेराची मदत.” “ कोण आहे ती? आणि कुठे आहे अत्ता?” पाणिनीनं विचारलं “ तिचं नाव आहे रती रायबागी, पण तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे.” –सौंम्या पाणिनीने आश्चर्याने भुवया उंचावल्या. “ मी साडेबाराला जेवायला बाहेर गेले, जातांना आपल्या रिसेप्शनिस्ट गती ला सांगून गेले होते.मी बाहेर पडले आणि पाच दहा मिनिटात ही बया आली म्हणे.खूप चिडून आली होती.गतीला म्हणाली कि कोणत्याही स्थितीत तिला पाणिनी ...Read More

2

मर्डर वेपन - प्रकरण 2

प्रकरण २ ऑफिसची वेळ संपत आली तेव्हा सौम्याने पाणिनीला विचारलं, “ बंद करायचं ऑफिस?” “आणखी काही करण्यासारखं हातात नाही पाणिनी म्हणाला. “सर तुम्ही त्या मुलीचा रात्रभर विचार करत बसणार आहात का?” “तिला विसरता येत नाही. मला वाटतं आपण तिला भेटायला विलासपूर ला जाऊया” “पण ती तिथे नाहीये अत्ता.” “पण तिचा फ्लॅट तिथे आहे आणि आपल्याकडे त्या फ्लॅटची किल्ली आहे.” “तिच्या घरात आपल्याला काय सापडणारे?” “काहीतरी क्लू मिळेल किंवा कदाचित काही मिळणारही नाही.” पाणिनी म्हणाला. “सर, तुम्ही तिच्या फ्लॅटमध्ये शिरणार आहात?” “मलाच माहीत नाही. आता तरी काही सांगता येणार नाही. पूल आला की तो कसा ओलांडायचा याचा मी विचार करीन. ...Read More

3

मर्डर वेपन - प्रकरण 3

मर्डर वेपन प्रकरण ३ “ एक मिनिट, तुला नक्की पोलिसांना बोलवायचं आहे?” पाणिनीनं विचारलं “ का नाही बोलवायचं? तुम्ही....” ओरडली. “ तू माझ्या ऑफिसात तुझी हँड बॅग विसरून आलीस त्यात अशा काही वस्तू होत्या की पोलिसांनी त्या पहिल्या तर तू अडचणीत येऊ शकतेस. त्या तुझ्या असोत किंवा नसोत, तुला त्याचा खुलासा पोलिसांना द्यावाच लागेल.” तिने फोन खाली ठेवला. पाणिनी पटवर्धन ने तो उचलून पुन्हा तिच्या हातात दिला. “ कर फोन.” तो म्हणाला. ती अडखळली. “ तुम्ही सर्व काही संग मला.” ती म्हणाली. “ सुरुवात तुम्ही करायला हवी,मिसेस रायबागी.तुम्ही माझ्या ऑफिसातून मला न भेटता निघून जाणे, किल्ल्या, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि ...Read More

4

मर्डर वेपन - प्रकरण 4

मर्डर वेपन प्रकरण ४ दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर सौंम्या पाणिनीला म्हणाली, “तुमच्या कालच्या लाडक्या अशिलाचा फोन आलाय सर.” तिने कडे फोन दिला. “ मिस्टर पटवर्धन, मला तुम्हाला तातडीने भेटायलाच हवंय” रती म्हणाली. “ तू इथे चैत्रापूर मधे आहेस?” पाणिनीनं विचारलं “ हो.” “ इथे कशी आलीस तू?” “ मी काल रात्रभर झोपू शकले नाही.मी जसजसा विचार करत होते तसतस मला तुमचं म्हणणं पटत गेलं.म्हणजे आपण एकत्र घरी जाऊन काही ...” “ काही काय?” पाणिनीनं विचारलं “ काही घडलं नाही ना ते पाहू.” “ म्हणजे?” पाणिनीनं विचारलं “ म्हणजे पद्मराग ने आजची त्याची सकाळी दहा ची अपॉइंटमेंट पाळली नसेल तर ...Read More

5

मर्डर वेपन - प्रकरण 5

प्रकरण ५ त्याच वेळी रिसेप्शानिस्ट गती ने इंटरकॉम वरून इन्स्पे.तारकर आत येत असल्याची बातमी दिली.“ मला वाटत तुम्ही मिसेस आहात.” आत घुसल्या घुसल्या रती कडे पहात तारकर म्हणाला.“ ओह! तारकर, ये,ये. तिच्यावर दबाव टाकून तू जी माहिती तू काढून घेऊ इच्छित आहेस ती मीच तुला देतो.” पाणिनी थेट विषयाला हात घालत म्हणाला. “ तिला थोड्याच वेळापूर्वी तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर कडून फोन आला की तिच्या नवऱ्याचा खून झालाय. आणि या गोष्टीला काही का होऊन गेलाय. तो म्हणाला की या घटनेची माहिती तो पोलिसांना देणार आहे.रती ने त्याला सांगितलं की ती इथे माझ्या ऑफिसात असल्याचं त्याने पोलिसांना सांगावं.”“ अरे वा ! ...Read More

6

मर्डर वेपन - प्रकरण 6

मर्डर वेपन प्रकरण ६ रती जाताच पाणिनीने कनक ओजस ला बोलावून घेतलं. “ कनक, तुला एक तातडीने काम करायचं ड्रॉवर मधे मी रिव्हॉल्व्हर ठेवलं होतं. ते चोरीला गेलंय काल रात्री किंवा आज पहाटे किंवा सकाळी.” “ किती घाई आहे?” “ कनक, माझ्या अशीलाच्या ड्रॉवर मधून पळवलं गेलेलं रिव्हॉल्व्हर मला भलत्याच बाईने कदाचित चोराने इथे माझ्या ऑफिसात आणून ठेवलं, सर्वांच्या नकळत, आणि तेच माझ्या ताब्यातून चोरीला गेलंय.” “ आता हे ऐकल्यावर सरकारी वकील खांडेकर तुझ्यावर कुभांडच रचतील.” कनक म्हणाला. “ अगदी बरोबर.” “ कोणी चोरलं असेल काही अंदाज?” –कनक “ मला संशय तर माझ्याच अशिलावर आहे. रती रायबागी वर ! ...Read More

7

मर्डर वेपन - प्रकरण 7

मर्डर वेपन प्रकरण ७सँडविच खाऊन झाल्यावर सौंम्या सोहोनी गती च्या खुर्चीवर जाऊन बसली आणि दहाच मिनिटांनी पाणिनी चा इंटरकॉम मी रिसेप्शनिस्ट सौंम्या बोलत्ये,” मुद्दामच ती मिस्कीलपणे म्हणाली. “ बाहेर अंगिरस खासनीस नावाचे गृहस्थ आलेत.त्याचं म्हणणं आहे तुम्ही त्यांना बोलावलं आहे.”“ घेऊन ये त्यांना आत.”एक उंचपुरा,पस्तीशीचा माणूस, अंगात गडद रंगाचा सूट घातलेला,काळेभोर केस, पाणिनी समोर आला.दोघांनी शेक हँड केला.“ बसा.” पाणिनी म्हणाला. तो पाणिनी समोरच्या गुबगुबित खुर्चीत बसला. “ मला काही माहिती तातडीने हवी होती.मला वाटतंय तुम्ही त्यासाठी अगदी योग्य माणूस आहात.” पाणिनी म्हणाला.“ नक्कीच.मला शक्य ती सर्व माहिती देईन.” अंगिरस म्हणाला.“मला वाटतं तुम्हाला बरीच चौकशी करायची असेल पण साहेब ...Read More

8

मर्डर वेपन - प्रकरण 8

मर्डर वेपन प्रकरण ८ रिसेप्शनिस्ट गती ने पाणिनी ला फोन केला आणि सांगितलं की नंदर्गीकर नावाची स्त्री बाहेर आल्ये खासनीस ला द्यायला तिने एक पाकीट आणलंय. “ पाठव तिला आत.” पाणिनी गतीला म्हणाला. नंतर खासनीस ला म्हणाला, “ तू तिचा ज्या प्रकारे उल्लेख केलास त्यावरून ती अविवाहित असेल असं मला वाटलं होतं, उगाचच.” “ नाही विवाहित आहे ती. ” खासनीस म्हणाला. “ जरा दुख:द घटनाच आहे तिच्या बद्दल.” “ विधवा आहे?” पाणिनीनं विचारलं “ नाही, घटस्फोटित.” खासनीस म्हणाला. “ एक दिवस संध्याकाळी तिचा नवरा ऑफिसातून परत आलाच नाही.त्यानंतर तिने त्याला कधीच पाहिलं नाही. नंतर तिने घटस्फोट घेतला.” “ कधी ...Read More

9

मर्डर वेपन - प्रकरण 9

प्रकरण ९“ मी सरकारी वकील हेरंब खांडेकर. माझ्या बरोबर आहेत इन्स्पे. तारकर, आणि रती चे वकील पाणिनी पटवर्धन, आणि सेक्रेटरी सौंम्या सोहोनी. मला ताबडतोब तुमचे सगळे कर्मचारी इथे हजर पाहिजेत. इथे काय घडलंय याची संपूर्ण माहिती मला हव्ये.मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ” रायबागी च्या ऑफिसात आल्या आल्याच खांडेकरांनी जोरदार आवाजात हुकूम सोडला.त्यांच्या जाडजूड देह यष्टीत आणि भरदार आवाजात अशी जादू होती की थोड्याच अवधीत त्यांनी सगळी सूत्र हातात घेतली.काही मिनिटातच सगळे कर्मचारी त्यांच्या भोवती गोळा झाले.“ इथला प्रमुख कोण आहे त्याने पुढे या.” त्यांनी हुकूम सोडला.“ मी, मी आहे.” गर्दीतून एक आवाज आला.“ पुढे या.” खांडेकर म्हणाले. “ ...Read More

10

मर्डर वेपन - प्रकरण 10

प्रकरण १० ऑफिसात आल्यावर पाणिनी बराच विचारात पडला होता. बेचैन होऊन इकडून तिकडे फिरत होता. “ सौंम्या, पद्मराग रायबागीनेत्याच्या दोन रिव्हॉल्व्हर खरेदी केल्या.एक रती शी लग्न होण्यापूर्वी आणि एक लग्न झाल्यावर. आता असा विचार करुया की त्याने मैथिलीला सुद्धा रिव्हॉल्व्हर दिली असेल का?शक्यता आहे कारण ती खूप प्रवास करायची.तिची मित्र मंडळी सुद्धा होती खूप.तिच्या संरक्षणासाठी त्याने रिव्हॉल्व्हर दिली असावी. ” “ पण सर,त्याने एक रिव्हॉल्व्हर रतीला दिली होती.” सौंम्या म्हणाली. “ बरोबर आहे,एक रतीला दिली होती,पण तिला त्याचा नंबर माहिती नाहीये.म्हणजे तिच्या दृष्टीने विचार केला तर तिला एक रिव्हॉल्व्हर मिळाली, नंबर बघायची गरजच तिला कधी भासली नाही.” पाणिनी म्हणाला. ...Read More

11

मर्डर वेपन - प्रकरण 11

मर्डर वेपन. प्रकरण ११ सरकार पक्ष विरुद्ध रती रायबागी खटला चालू झाला.न्या. ऋतुराज फडणीस यांनी हातातला हातोडा आपटून कोर्टात गर्दीला शांत करून विचारलं, “ दोन्ही बाजू तयार आहेत?” खांडेकरांचा सहाय्यक प्रियमेध चंद्रचूड उभा राहिला “ आम्ही तयार आहोत.” तो म्हणाला. “ आम्ही पण ” पाणिनी म्हणाला. “ खटला चालू करण्यापूर्वी काही गोष्टी मी आधीच स्पष्ट करू इच्छितो. वर्तमान पत्रातल्या बातम्यावरून मला समजलंय की मैथिली ने रायबागी च्या मालमत्तेवर विल नुसार हक्क सांगितला आहे तर रती ने रायबागी ची विधवा पत्नी या नात्याने हक्क सांगितला आहे. याचा निर्णय संबंधित कोर्ट घेईल,माझ्या कोर्टात रायबागी विषय चर्चिला जाता कामा नये.अर्थात खुनाचा हेतू ...Read More

12

मर्डर वेपन - प्रकरण 12

मर्डर वेपन प्रकरण १२ “ मी आता अंगिरस खासनीस याला साक्षीसाठी बोलावतो.” प्रियमेध चंद्रचूड ने जाहीर केलं. “ गेली वर्षं तू रायबागी एन्टरप्रायझेस मधे मॅनेजर आहेस? ” –चंद्रचूड “ हो.” “ युअर ऑनर,हा आमच्या विरोधातला साक्षीदार आहे,म्हणजे आरोपीशी मैत्रीपूर्ण संबंध असलेला आहे.त्यामुळे याला थोडे आक्रमक आणि सूचक प्रश्न विचारावे लागतील.” चंद्रचूड न्यायाधीशांना म्हणाला. “ अत्ता तर तुम्ही त्याला एकच प्रश्न विचारलाय,त्यातून तो विरोध करणारा साक्षीदार आहे असं वाटत नाही.तुम्ही तुमच्या नेहेमीच्या पद्धतीने साक्ष घ्या.मला तसं काही वाटलं तर मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारायला परवानगी देईन.” “ ठीक आहे युअर ऑनर.” चंद्रचूड म्हणाला आणि नंतर खासनीस ला उद्देशून त्याने ...Read More

13

मर्डर वेपन - प्रकरण 13

प्रकरण १३जेवण्याच्या सुट्टीत सौंम्या,कनक आणि पाणिनी हॉटेलात बसले होते.“ पाणिनी,मला टिप मिळाली आहे की दुपार नंतर ते तुला काहीतरी द्यायच्या तयारीत आहेत.” कनक ओजस म्हणाला.“ काय आहे नेमकं?” पाणिनीने विचारलं“ ते नाही समजलं.”“ कनक, तुझ्या लक्षात आलं का अंगिरस खासनीस कुठलातरी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ नये या काळजीत पडलेला होता.जेव्हा तो प्रश्न त्याला न विचारताच चंद्रचूड यांनी तपासणी थांबवली,तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावर संकटातून सुटल्याचा भाव होता. बर,ते असू दे.उत्क्रांत उद्गीकर बद्दल काय? ” पाणिनीने विचारलं“ तो कॉन्ट्रॅक्टर आहे.पंचावन्न वय आहे.विधुर आहे.त्याच केरशी शहरात घर आहे.घराचा मागचा भाग तो भाड्याने देतो,नेहेमी.त्याला एक मुलगी आहे ती कॉलेज ला आहे.बाहेर गावी राहते.”कनक ने ...Read More

14

मर्डर वेपन - प्रकरण 14

प्रकरण १४ जेवायच्या सुट्टी नंतर कोर्ट सुरु व्हायच्या आधीच लोकांनी कोर्टात गर्दी केली.वरिष्ठ सरकारी वकील हेरंब खांडेकर अचानक कोर्टात झाले. खांडेकर हे बलदंड शरीराचे आणि रुंद खांदे असलेले व्यक्तिमत्व होते. एखाद्या पिंपासारखे दिसायचे.आवाजही शरीराला साजेसा होता. “ मी तुला म्हणालो होतो ना पाणिनी, त्यांच्याकडे काहीतरी धक्कादायक बातमी आहे आणि त्यासाठीच खांडेकर आलेत. ” कनक ओजस म्हणाला. पाणिनीने काही न बोलता फक्त मान डोलावली.पोलीस रतीला घेऊन कोर्टात आले.पाणिनीने पटकन संधी साधून तिला विचारलं, “ सोमवारी सकाळी तू तुझ्या नवऱ्याच्या घरातून नेमकी कधी बाहेर पडलीस?” “ सकाळी सहाच्या सुमाराला असेल.” रती म्हणाली. “ आणि नंतर दिवसभर कुठे होतीस तू?” पाणिनीने विचारलं ...Read More

15

मर्डर वेपन - प्रकरण 15

प्रकरण १५ पुन्हा कोर्ट सुरु झालं तेव्हा खांडेकर न्यायाधीशांना म्हणाले, “ मला असा साक्षीदार तपासायचा आहे आता, की ज्याने विशिष्ट ठिकाणी गडद रंगाचा गॉगल घातला असतांना पहिलय. आता त्याने तिला ओळखावं म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की आरोपीला तसाच गॉगल घालायला सांगावं.” “ ही जरा विचित्रच विनंती आहे तुमची. मास्क लावून दरोडा टाकणाऱ्याला ओळखण्यासाठी साक्षीदाराला सुद्धा मास्क लावायला सांगितल्यासारखं आहे हे.” न्या.फडणीस म्हणाले. “ मला नाही वाटत तसं. ओळख पटवण्यासाठी अनेक गोष्टी असतात, आवाज, शरीराची ठेवण , डोक्याचा आकार, डोळे, वगैरे. गॉगल हा त्यातलाच एक भाग आहे.” खांडेकर म्हणाले. फडणीस मान हलवून नाही म्हणणार होते,तेवढ्यात त्यांची नजर पाणिनीकडे गेली. ...Read More

16

मर्डर वेपन - प्रकरण 16

प्रकरण १६न्या. फडणीसांनी दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू होताच विचारलं, “ या सर्वांचा काय खुलासा द्याल तुम्ही खांडेकर?”“ सूज्ञा पालकर गर्दीच्या ठिकाणी येऊन एखादी गोष्ट करायला भीती वाटते.म्हणजे एक प्रकारचा मानसिक आजार आहे तिला.पाणिनी पटवर्धन यांनी तिची ही कमजोरी हेरून तिला मुद्दामच कोर्टात गर्दीसमोर यायला लावलं आणि आपल्या अशिलाला कसा फायदा करून घेता येईल हे पाहिलं. ” खांडेकर म्हणाले.“ मिस्टर पटवर्धन, तुमचं काय म्हणणं आहे? काही थेअरी आहे?” फडणीसांनी विचारलं.“ रायाबगी झोपेत मारला गेला, बरोबर? ” पाणिनीने विचारलं“ बरोबर.”“ मी माझी थेअरी या गृहितकावर आधारभूत ठेवली आहे की माझी अशील निर्दोष आहे.” पाणिनी म्हणाला.“ पुढे बोला.” न्यायाधीश म्हणाले.“ तो रात्री ...Read More

17

मर्डर वेपन - प्रकरण 17

प्रकरण १७ सकाळी पुन्हा कोर्ट चालू झालं तेव्हा कोर्टात सूज्ञा आली नव्हती.कोर्टाने खांडेकरांना खुणेनेच काय झालं म्हणून विचारलं. “ ऑनर, पोलिसांना अजून सूज्ञा सापडली नाहीये.” खांडेकर म्हणाले. “ पण आज ते तिला नक्की शोधून काढतील.” “ तुम्हाला तो पर्यंत आणखी काही साक्षीदार सादर करायचे आहेत?” न्या.ऋतुराज फडणीस यांनी विचारलं. “ नाही युअर ऑनर.” खांडेकर म्हणाले. “ युअर ऑनर , खुनी कोण असावं या बद्दल मला खात्री झाली आहे. त्यासाठी मला दोन साक्षीदारांची तपासणी करायची आहे. एक, अॅडव्होकेट भोपटकर आणि दुसरा कणाद मिर्लेकर. या दोघांच्या साक्षीतून खरा खुनी मी कोर्टासमोर हजर करेन. या दोन पैकी भोपटकर इथेच आहेत. मिर्लेकारांना कोर्टाने ...Read More

18

मर्डर वेपन - प्रकरण 18 - शेवटचे प्रकरण

प्रकरण १८ ( शेवटचे) दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट सुरु झालं. “ पटवर्धन यांच्या विनंतीनुसार कोर्टाने मिसेस मिर्लेकारांना समन्स काढलंय त्या कोर्टात हजर आहेत. ” न्यायाधीश म्हणाले. “ तुम्ही तुमचं काम चालू करा पुढे,मिस्टर पटवर्धन.” पाणिनी उठून उभा राहिला. “मी काल म्हणालो होतो की मला मिसेस मिर्लेकारांची साक्ष घ्यायची आहे, पण त्यापूर्वी मी आधी कालचे निवेदन पूर्ण करतो.आणि मग साक्षीला सुरुवात करतो.” पाणिनी म्हणाला. “ तर,युअर ऑनर, खून मिर्लेकरने केला नसला तरी तो त्याच्या अशा साथीदाराने केला आहे की जो खून करण्यावाचून त्या व्यक्तीला गत्यंतरच नव्हते. किंबहुदा ती व्यक्ती खून करेल या अटीवरच मिर्लेकर रायबागीच्या ऑफिसात मोठा अपहार करायला तयार ...Read More