पुनर्विवाह

(18)
  • 54.2k
  • 0
  • 33.7k

ही कथा पुर्णतर्ध: काल्पनिक आहे याचा वास्तव जीवनाशी काहीही संबंध नाही जर आढळला तर निव्वळ योगायोग समजावा.माझ्या कल्पना शक्तीला सुचलेली ही कथा आहे. रात्री चे दोन वाजले तरी अजय घरी आला नव्हता त्याची बायको स्वाती त्याची वाट बघत बसली होती. अजयची लेट येण्याच्यी ही काही पहिलीच वेळ नव्हती.मित्रां बरोबर पार्टी असली की, असाच त्याला उशीर व्हायचा .‌पण स्वाती त्याची वाट बघत बसायची. फोन लावून त्याला विचारावे असे तिला वाटलं पण तो विचार तिने झटकून टाकला कारण तो बाईक घेऊन गेला होता. अजय कधीतरीच घ्यायचा . वाट बघता बघता तिचा डोळा लागला.

1

पुनर्विवाह - भाग १

ही कथा पुर्णतर्ध: काल्पनिक आहे याचा वास्तव जीवनाशी काहीही संबंध नाही जर आढळला तर निव्वळ योगायोग समजावा.माझ्या कल्पना शक्तीला ही कथा आहे. भाग १ रात्री चे दोन वाजले तरी अजय घरी आला नव्हता त्याची बायको स्वाती त्याची वाट बघत बसली होती. अजयची लेट येण्याच्यी ही काही पहिलीच वेळ नव्हती.मित्रां बरोबर पार्टी असली की, असाच त्याला उशीर व्हायचा .‌पण स्वाती त्याची वाट बघत बसायची. फोन लावून त्याला विचारावे असे तिला वाटलं पण तो विचार तिने झटकून टाकला कारण तो बाईक घेऊन गेला होता. अजय कधीतरीच घ्यायचा . वाट बघता बघता तिचा डोळा लागला. अजय मित्रांना बाय करून निघत होता . ...Read More

2

पुनर्विवाह - भाग २

भाग २ साव़ंत काकू स्वाती च्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला उठवायचा प्रयत्न करु लागल्या , थोड्यावेळाने स्वाती शुद्धीवर आली. तिला म्हणाल्या ," स्वाती प्रसंग कठीण आहे पण आता हिम्मत हरून कसे चालेल ." स्वाती सतत रडत होती तिला रडताना बघून त्यांचा पाच वर्षांचा मुलगा सूदेश पण रडायला लागला. त्याला तिने आपल्या छातीशी घट्ट कवटाळून धरले. सावंत काकीना ती म्हणाली , " काकी तो आपला अजय तर नसेल ना." सावंत काकी, " नसेल असे काही. " अजय चा भाऊ विजय आणि त्याची बायको सरीता पण तिथे आली." साहेब मी विजय आहे अजय चा भाऊ काय झालं आहे" ."रात्री हायवे वर ...Read More

3

पुनर्विवाह - भाग ३

स्वाती ला आता खंबीर बनणे गरजेचे होते. अजय ला जाऊन बारा ‌दिवस झाले होते. आज त्याचे बारावे होते. स्वाती खूप एकटे वाटत होते ‌. सगळेजण तिच्या दुःखा च्या प्रसंगात तिच्या सोबत होते तरीसुद्धा ती एकटीच होती. कारण जोडीदारा ची साथ ही वेगळी च असते.आपलं सारं दुःख तिला आता मनाच्या तळाशी गाडून टाकायचे होते. आठवणी आयुष्य भर येणारचं होत्या.‌पण छोट्या सुदेश साठी तिला आता खंबीर बनावच लागणार होतं.तिचं जाॅब करण्याचा निर्णय तिच्या भावाला फारसं आवडले नव्हते. तिच्या दिराला पण आवडले नव्हते. ते दोघे मिळून दर महिन्याला एक ठराविक रक्कम तिला देणार होते. पण तिने त्या दोघांना ही समजावलं की, तुम्हा ...Read More

4

पुनर्विवाह - भाग ४

स्वाती ने ही गोष्ट अश्विनी घ्या कानावर घातली. अश्विनी ने स्वाती ला सल्ला दिला कि,तिने एक छोटेसे मंगळसूत्र तरी नाहीतर हे लोक तुला कावळ्या सारखे टोचे मारत राहतील. पण ...... स्वाती एकट्या बाईला जगणं फार कठीण आहे . हयाचं आपण काय तरी करूच पण बाहेरच्या जगात तुला अशी भरपूर लोक भेटतील म्हणून सांगते छोटं मंगळसूत्र तरी घाल.दोन चार दिवस मध्ये गेले असतील. तिच्या ऑफिस मधला तो कलिग माने तिच्या जवळ येताना दिसला. तसे तिने व्हॉईस रेकॉर्डर चालू केला. अश्विनी ने पण त्याला स्वाती जवळ जाताना बघितले. अश्विनी ‌तिच्या पाठी मागच्या टेबल वरच बसली होती तिने पण आपल्या मोबाईल चे ...Read More

5

पुनर्विवाह - भाग ५

स्वाती स्वयंपाक घरात काम करत होती. सुदेश स्वाती ला म्हणाला, "आई मामा आला आहे."सुदेश मामाला बघून खूप खुश होतो. ला‌ पण खूप आनंद झाला. नितीन," अगं , असचं आलो गं तुम्हाला भेटायला. हे घे सुदेश. " नितीन सुदेश ला चॉकलेट देतो आणि त्याने त्याच्या साठी आणलेला खूप सारा खाऊ पण देतो. इतक्यात विजय झाला पण तिथे येतो. स्वाती," अरे, विजय दादा तुम्ही पण आलात. आज सुदेश खूपच खूश होणार आहे. विजय दादा पण खूप खाऊ घेऊन येतात. मी तुम्हा दोघांसाठी काही तरी खायला करते. अगं स्वाती काही नको करुस. इतक्यात सुदेश चे मित्र त्याला बोलवायला येतात. सुदेश स्वाती ला ...Read More

6

पुनर्विवाह - भाग ६

भाग ६ स्वाती अश्विनी ला म्हणाली उद्या जरा मला तुझ्याशी बोलायचे आहे, ऑफिस सुटल्यावर वेळ काढशील का अश्विनी, " ठिक आहे. स्वाती ने सावंत काकूंच पण मत ऐकायच ठरवले. संध्याकाळी जेव्हा ती सुदेशला घ्यायला सावंत काकूंच्या घरी गेली. तेव्हा तीने त्यांना नितीन चे म्हणणे सागितले. त्यावर त्या म्हणाल्या की, स्वाती तो तुझा भाऊ आहे. त्याला तुझी काळजी वाटणे सहाजिकच आहे. तो तुझा भाऊ आहे त्याला तुझी काळजी वाटणे सहाजिकच आहे. मला तरी त्याचं म्हणणं बरोबर च वाटतयं. अख्खं आयुष्य पडलं आहे तुझ्यापुढे. आर्थिक दृष्ट्या पण आधाराची गरज लागतेच गं बाई. तु खूप नशिबवान आहेस जो तुला असा भाऊ आणि ...Read More