किस्से चोरीचे

(10)
  • 36.6k
  • 0
  • 19.5k

चोरी टळलेली... बारावी पर्यंत माझे शिक्षण खेडेगावांत झाले होते. कॉलेज शिक्षणासाठी मी भावाकडे येरवड्याला पुण्यात आलो. बारावीत माझ्याबरोबर शिकणाऱ्या आम्ही काही मित्रांनी ठरवून एकाच कॉलेजला प्रवेश घ्यायचे ठरवले होते. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे आम्हा सर्वांना असलेला आमचा खेड्यातून आल्याचा न्यूनगंड! शहरांतल्या मुलांच्यात आम्हाला जर सामावून घेतले गेले नाही तर आपण एकटे पडू नये अशा भावनेतून केलेली ती कृती होती. तर आम्ही गृपने पुण्यातल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला. तर सदर कथा घडली त्यावेळी मी गरवारे कॉलेजात फर्स्ट इयरला शिकत होतो. त्यावेळी आर्थिक परिस्थिती एकदम बिकट होती.येरवडा ते डेक्कन जिमखाना बसचा पासही खिशाला परवडणारा नव्हता शिवाय बसच्या वेळाही अनिश्चित असायच्या.

Full Novel

1

किस्से चोरीचे - भाग 1

चोरी टळलेली... बारावी पर्यंत माझे शिक्षण खेडेगावांत झाले होते. कॉलेज शिक्षणासाठी मी भावाकडे येरवड्याला पुण्यात आलो. बारावीत माझ्याबरोबर शिकणाऱ्या काही मित्रांनी ठरवून एकाच कॉलेजला प्रवेश घ्यायचे ठरवले होते. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे आम्हा सर्वांना असलेला आमचा खेड्यातून आल्याचा न्यूनगंड! शहरांतल्या मुलांच्यात आम्हाला जर सामावून घेतले गेले नाही तर आपण एकटे पडू नये अशा भावनेतून केलेली ती कृती होती. तर आम्ही गृपने पुण्यातल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला. तर सदर कथा घडली त्यावेळी मी गरवारे कॉलेजात फर्स्ट इयरला शिकत होतो. त्यावेळी आर्थिक परिस्थिती एकदम बिकट होती.येरवडा ते डेक्कन जिमखाना बसचा पासही खिशाला परवडणारा नव्हता शिवाय बसच्या वेळाही अनिश्चित असायच्या. ...Read More

2

किस्से चोरीचे - भाग 2

किस्से चोरीचे... त्यावेळी मी जेमतेम आठ नऊ वर्षांचा असेन.त्या वर्षीच्या उन्हाळ्यात आमच्या गावाच्या पंचक्रोशीत दरोडेखोर आणि किरकोळ चोरट्यांचीही बरीच झाली होती.आजूबाजूच्या गावांत दररोज कुठे ना कुठे दरोडा पडल्याच्या बातम्या यायच्या. "काल कांबळवाडीत चोर घुसले होते" "परवा टोणपेवाडीत चोरट्यांनी मारहाण करून घर लुटले""पहाटे चोरटे आपल्या गावाच्या रस्त्यावर ट्रक घेऊन आले होते त्यांच्याकडे लाठ्या काठ्या आणि गोफणी होत्या" किंवा "ते चोरटे फक्त चोऱ्याच करत नाहीत तर लोकांना बेदम मारहाणही करतात." अशा बातम्या कुठून कुठून यायच्या आणि त्या बातम्यांमुळे गावात आणि वाड्या वस्त्यांवर सगळे लोक चांगलेच घाबरायला लागले होते.अंधार पडायच्या आत सगळे लोक घरी परतायला लागले होते. लोकांच्या बोलण्यात सतत चोरटे आणि ...Read More

3

किस्से चोरीचे - भाग 3

किस्से चोरीचे भाग तीन ते एकोणीसशे नव्वद साल होते. त्या आधी मी वडगावशेरीत रुके यांच्या चाळीत राहात होतो. तेथेच असताना माझे नोकरीतले पहिले प्रमोशन झाले आणि आर्थिक बाजू सुधारल्याने मी पुण्यातल्या बालाजीनगर भागात एक छोटासा वन रूम किचन फ्लॅट विकत घेतला.चाळीतल्या भाड्याच्या घरातून छोट्या का होईना;पण बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये रहायला जाण्यातला आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता. घरगुती पूजा करून मी ताबडतोब या नव्या घरी रहायला गेलो. त्याच्या काही महिनेच आधी मी माझी स्वतःची पहिली दुचाकी अर्थात लुना टी एफ आर प्लस कर्ज घेऊन घेतली होती. एकंदरीत आयुष्याचा प्रवास थोडा थोडा गती पकडत होता. मी बालाजीनगरला नव्या ...Read More

4

किस्से चोरीचे - भाग 4

त्या काळी मी पुण्यातल्या वडगावशेरी गावात रुके चाळीत रहायला होतो आणि माझा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता. मी पुण्यात असलो तरी वेगवेगळ्या निमित्ताने पुण्याहून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या गावी अधूनमधून अगदी सह कुटुंबं जात असे. हा प्रसंग घडला तेव्हा अशाच एका कौटुंबिक कार्यक्रमसाठी मला माझ्या गावाकडच्या भावाकडून बोलावणे आले होते.घरातला अत्यंत महत्वाचा धार्मिक कार्यक्रम असल्याने तो अटेंड करणे मला आवश्यक होते.त्या काळी गावाकडे जायला एस टी अर्थात आपल्या लालपरी शिवाय दुसरा पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता आणि त्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर जायला लागलायचे. गावाकडच्या त्या कार्यक्रमाला मी माझी पत्नी आणि माझा दोन वर्षे वयाचा मुलगा असे आम्ही तिघे जाणार ...Read More

5

किस्से चोरीचे - भाग 5

किस्से चोरीचे आम्ही पती पत्नी नोकरी करत असूनही बरीच वर्षे घरातल्या कामासाठी कोणी मोलकरीण ठेवलेली नव्हती. खरे तर घरची आणि नोकरीची धावपळ यात आमची दोघांचीही खूप दमछाक व्हायची;पण सुरुवातीच्या काळात आर्थिक दृष्टया परवडत नव्हते म्हणून आणि पुढे स्थिरता येऊनही घरकामासाठी मोलकरीण ठेवणे फारसे मनावर घेतले नव्हते. याचे कारण म्हणजे आमच्या वेळेत घरी येऊन काम करू शकणारी कामवाली मिळवणे सोपे नव्हते.शिवाय आमच्या गैर हजेरीत कुणा अनोळखी कामवालीवर घर सोपवणे आमच्या दोघांच्याही मनाला पटत नव्हते. माझ्या मुलाचे लग्न झाल्यावर मात्र वाढलेली घरातली कामे उरकणे आवाक्यबाहेर वाटल्याने आमच्या शेजारच्या वस्तीतली एक मावशी,(आम्ही घरात सगळे त्यांना ताई म्हणायचो) स्वयंपाक आणि साफ सफाईसाठी ठेवल्या. ...Read More

6

किस्से चोरीचे - भाग 6

किस्से चोरीचे आपण चोरी म्हटले की साधारणपणे कोणत्या तरी महत्वाच्या किंमती वस्तूची चोरी असे गृहीत धरतो;पण चोरी फक्त वस्तूचीच असे नाही. तर अशाच एका वेगळ्या प्रकारच्या चोरीबद्दलचा हा किस्सा मी सांगणार आहे... त्यावेळी नोकरीत माझे नुकतेच पहिले वाहिले प्रमोशन झाले होते आणि पुण्यातील कॅम्प विभागातल्या जुन्या टेलिफोन लाईन आणि केबल नेटवर्कचे अपग्रेडेशन अर्थात नूतनीकरण करायचे महत्वाचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते. या कामात नवीन केबल टाकणे जुनी संसाधने बदलून नवी बसवणे टेलिफोन नादुरुस्त होण्यासाठी कारणीभूत असलेली तांत्रिक कारणे कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करून निरीक्षणासाठी नेमलेल्या विशेष विभागाकडून प्र माणि त करून घ्यायचे अशा प्रकारचे काम माझ्यावर सोपवले ...Read More

7

किस्से चोरीचे - भाग 7

किस्से चोरीचे अगदी दोन हजार चार सालापर्यंत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल सेवा पोहोचलेली नव्हती.शहरांत खाजगी कंपन्यानी मोबाईल सेवा सुरु केले असले तरी ती खूप महागडी होती.ग्रामीण भागात त्यावेळी लँडलाईन हेच मुख्य संपर्कसाधन उपलब्ध होते.आमच्या खात्याच्या टेलिफोन लाईन्स मुख्यत्वे जमिनीखालून टाकलेल्या केबल्सवर चालायच्या. या केबल्समधील वाहक तारा या किमती तांब्याच्या असायच्या त्यामुळे आमच्या खात्याला कायमच केबल चोरांचा उपद्रव व्हायचा. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात अशा अनेक केबल चोरीच्या नियमितपणे घटना घडत असत. एकदा का एखाद्या विभागात अशी केबल चोरीची घटना घडली की त्या विभागाच्या अधिकाऱ्याला खूपच डोकेदुखी व्हायची.केबल चोरी झाल्यावर त्या केबलवर चालणारे सगळे टेलिफोन बंद व्हायचे.टेलिफोन ग्राहकांच्या तक्रारीना ...Read More