अंगडिया स्टोरी

(8)
  • 21.5k
  • 1
  • 10.8k

मुकेश अंगडिया सकाळी साडे नवाच्या सुमारास ऑफिस मधे नुकतेच पोचले होते. इतक्यात त्यांच्या ऑफिस मधला फोन वाजला. मुकेशनी फोन उचलला. मुंबईहून लाइटनिंग कॉल होता. किरीटभाई बोलत होते. “कलकत्याहून दिनेश निघाला आहे. आज अडीच वाजता हावरा मुंबई एक्सप्रेस नागपूरला पोचेल. ठरल्या प्रमाणे ठरलेली १० रुपयांची नोट घेऊन स्टेशन वर जा आणि किट बॅग ताब्यात घ्या. घरपोच डिलीव्हरी आहे. त्या प्रमाणे ती सरक्षित पणे पोचवा. आणि डिलीव्हरी ची पावती घ्या. आणि आम्हाला पाठवा.” मुकेश भाईंनी होकार भरला. हे नेहमीचं नव्हतं पण कधी कधी अशी डिलीव्हरी करावी लागायची. आज भारतात अनेक कोरियर सर्विसेस आहेत, आणि आपण त्यांचा जरुरीनुसार वापर पण करतो. परंतु साधारण १९९० च्या अगोदर इतक्या व्यापक प्रमाणावर कोरियर सर्विसेस उपलब्ध नव्हत्या. त्या काळात छोट्या छोट्या कोरियर सर्विसेस होत्या त्यांना अंगडिया म्हणायचे. या छोट्या कंपन्या मोठ्या अंगडिया कंपनीशी सहकार्य करायच्या. त्यामुळे कुठून कुठेही आपली वस्तु पाठवता यायची. आधार होता विश्वास. या कंपन्या फक्त आणि फक्त विश्वासावर चालायच्या. त्यामुळे लोकं त्यांच्या मार्फत हीरे, दाग दागिने, कॅश आणि अतिशय महत्वाचे कागदपत्र अगदी निर्धास्त पणे पाठवायचे. आणि हे सुद्धा अत्यंत नाम मात्र भाड्या मधे. किरीट भाईंची अशीच मोठी कंपनी होती आणि ती मुंबई, सूरत आणि कलकत्ता शहरांचा व्याप सांभाळायची. मुकेशभाईची अंगडिया कंपनी किरीट भाईच्या कंपनीशी संलग्न होती.

Full Novel

1

अंगडिया स्टोरी - भाग १

अंगडिया स्टोरी भाग १ मुकेश अंगडिया सकाळी साडे नवाच्या सुमारास ऑफिस मधे नुकतेच पोचले होते. इतक्यात त्यांच्या ऑफिस मधला वाजला. मुकेशनी फोन उचलला. मुंबईहून लाइटनिंग कॉल होता. किरीटभाई बोलत होते. “कलकत्याहून दिनेश निघाला आहे. आज अडीच वाजता हावरा मुंबई एक्सप्रेस नागपूरला पोचेल. ठरल्या प्रमाणे ठरलेली १० रुपयांची नोट घेऊन स्टेशन वर जा आणि किट बॅग ताब्यात घ्या. घरपोच डिलीव्हरी आहे. त्या प्रमाणे ती सरक्षित पणे पोचवा. आणि डिलीव्हरी ची पावती घ्या. आणि आम्हाला पाठवा.” मुकेश भाईंनी होकार भरला. हे नेहमीचं नव्हतं पण कधी कधी अशी डिलीव्हरी करावी लागायची. आज भारतात अनेक कोरियर सर्विसेस आहेत, आणि आपण त्यांचा जरुरीनुसार वापर ...Read More

2

अंगडिया स्टोरी - भाग २

अंगडिया स्टोरी भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा ...... एक ऑटो रिक्शा जवळ आली, शेजारीच अजून एक उभा होता त्याने किटबॅग ऑटो रिक्शा मध्ये टाकली आणि तो पण बसला. ऑटो रिक्शा अतिशय वेगाने तिथून निघून गेली. द्वारका आणि रिक्षावाला ओरडत त्या ऑटो रिक्शा च्या मागे धावले, पण तो पर्यन्त तो दिसेनासा झाला होता. ऑटो रिक्शा तूफान स्पीडने धावत होती. कोणी आपल्या मागावर तर नाही या भीतीने, गल्ली बोळातून रिक्शा धावत होती. शेवटी, आपला कोणी पाठलाग करत नाहीये, याची खात्री झाल्यावर, रिक्शावाल्याने रिक्शा सुभाष रोडवरती घातली. सुभाष रोड हा पूर्व नागपूर आणि पश्चिम नागपूरला जोडणारा मेन रोड. नागपूरातला ...Read More

3

अंगडिया स्टोरी - भाग ३

अंगडिया स्टोरी भाग ३ भाग २ वरुन पुढे वाचा ...... थैला अजूनही सीलबंद होता. पंचनामा करून त्या थैल्याची नोंद आली. सर्व जणांचे बयाण पण नोंदवण्यात आले. थैला मुकेश अंगडियाचा होता हे स्पष्ट झालं होतं. आता प्रश्न हा होता की चोरी होऊनही संबंध दिवसभरात मुकेश भाईंनी पोलिस स्टेशन मधे तक्रार का नोंदवली नाही. ती केली असती तर आत्ता पर्यन्त शहरातल्या सर्व ठाण्यांना त्यांची माहिती मिळाली असती. रात्र बरीच झाली होती रात्रीचे 3 वाजले होते, म्हणून साहेबांनी विचार केला की उद्या सकाळी सकाळी मुकेश भाईंना बोलाऊन घेऊ. मग सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. सकाळी पोलिसांनी फोन करून मुकेशभाईंना गणेश पेठ पोलिस स्टेशन ...Read More

4

अंगडिया स्टोरी - भाग ४ - अंतिम भाग

अंगडिया स्टोरी भाग ४ (अंतिम) भाग ३ वरुन पुढे वाचा ...... “लिलाव कोण करणार आहे?” – इंस्पेक्टर साहेब. “आत्ता मला माहीत नाही साहेब, पण हे लिलाव करणारे सरकारमान्य असतात. सरकार दरबारी त्यांची नोंद असते. असे लिलाव होतात तेंव्हा सर्व बाबी ठरल्यावर सरकारला त्यांची माहिती कळवल्या जाते. त्यांच्या कडून ओके आल्यावरच लिलावांची तारीख आणि स्थळ जाहीर होतं. योग्य वेळी पोलिसांना पण सूचना दिल्या जाते. लिलाव कोण करणार हे, समोरची पार्टी कोणाला कॉंट्रॅक्ट देते त्यावर अवलंबून आहे. ते त्रिलोक भाईंना पण माहीत असण्याची शक्यता नाही.” – किर्तीभाई. “जर कोणालाच काही माहिती नाही, तर त्रिलोक भाईंना बातमी कशी कळली?” - इंस्पेक्टर “एका ...Read More