पासपोर्ट

(2)
  • 20k
  • 1
  • 9.1k

वसंत राव नुकतेच निवृत्त झाले होते. फंडांची रक्कम अकाऊंट मध्ये जमा झाली होती. भरगच्च पेंशन दर महिन्याला मिळणार होती. म्हणजे तशी आर्थिक सुबत्ता होती. एका financial expert शी बोलून त्यांच्या सल्याने त्यांनी फंडातली बरीचशी रक्कम कुठे कुठे गुंतवली होती. अशी सगळी व्यवस्था झाल्यावर, त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता बाई, एक दिवस रात्री जेवण झाल्यावर वसंत रावांना म्हणाल्या – अहो, मी काय म्हणते, अग म्हणल्यावरच कळेल न, आधीच कसं कळणार ? . आणि असं म्हणून जोरात हसले. त्यांच्या मते त्यांनी मोठाच विनोद केला होता. पण सुनीता बाईंना तसं वाटलं नाही. अहो, काय हे, प्रत्येक गोष्ट कशी हसण्या वारी नेता तुम्ही ? ते काही नाही. आता माझं ऐकाच. बरं ऐकतो , सांग काय म्हणतेस. मी काय म्हणते, अग पुन्हा तेच, काय ते बोल ना. सांगतेच आहे पण तुम्ही बोलू द्याल तेंव्हा ना. आता मधे मध्ये बोलू नका. आणि मी काय सांगते ते ऐका. ओके. बोल रिटायर झाल्यावर आपल्याला बरेच पैसे मिळाले आहेत तेंव्हा आपण फिरायला जाऊ शकतो. थोडा फार खर्च करू शकतो. काय म्हणता ? कुठे जायची इच्छा आहे तुला ? आपण मध्यम वर्गीय आहोत, आणि तसं म्हंटलं तर आयुष्य गेलं, रोजच्या कटकटी आणि मुलांची दुखणी खुपणी आणि त्यांच्या खर्चाला प्राधान्य देऊनच. आता सगळे आपापल्या संसारात रमले आहेत. तेंव्हा आपण “आपलं” असं आयुष्य जगू की. आपल्या मनाला वाटेल, आपल्या मनाला भावेल असं काही तरी करू की. होईल थोडा खर्च, काय फरक पडतो ?

Full Novel

1

पासपोर्ट - भाग १

पास पोर्ट भाग १ वसंत राव नुकतेच निवृत्त झाले होते. फंडांची रक्कम अकाऊंट मध्ये जमा झाली होती. भरगच्च पेंशन महिन्याला मिळणार होती. म्हणजे तशी आर्थिक सुबत्ता होती. एका financial expert शी बोलून त्यांच्या सल्याने त्यांनी फंडातली बरीचशी रक्कम कुठे कुठे गुंतवली होती. अशी सगळी व्यवस्था झाल्यावर, त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता बाई, एक दिवस रात्री जेवण झाल्यावर वसंत रावांना म्हणाल्या – अहो, मी काय म्हणते, अग म्हणल्यावरच कळेल न, आधीच कसं कळणार ? . आणि असं म्हणून जोरात हसले. त्यांच्या मते त्यांनी मोठाच विनोद केला होता. पण सुनीता बाईंना तसं वाटलं नाही. अहो, काय हे, प्रत्येक गोष्ट कशी हसण्या वारी ...Read More

2

पासपोर्ट - भाग २

पासपोर्ट भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा. “खरं आहे तुमचं म्हणण पण अहो, मी आजवर एकटी गेले नाहीये, नेहमी तुम्ही बरोबर असताच.” – सुनीता बाई. “हो, पण आता तुम्ही दोघी असाल नं, आणि दोघी ग्रॅजुएट आहात, अडाणी नाही. सुनेत्रा तर नोकरी करते आहे. आणि मैत्रीण बरोबर असल्यावर तुला माझी आठवण सुद्धा येणार नाही. परत फक्त १५ दिवसांचाच तर प्रश्न आहे. ते ही तुम्ही ट्रॅवल कंपनी बरोबर जाणार आहात, सगळी काळजी घेतीलच ते. हे १९९० साल आहे, आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अठराव्या शतकात नाही. आता सगळ्या सोई झाल्या आहेत.” – वसंत राव त्या रात्री ...Read More

3

पासपोर्ट - भाग ३ (अंतिम )

पासपोर्ट भाग ३ भाग २ वरुन पुढे वाचा. रंगनाथ साहेबांनी सांगितलं की हे काम इतक्या सहजा होत नाही. तुम्हाला पासपोर्ट मिळेल पण आठवडा तरी लागेल. तुमचे पेपर इंडियात जातील तिथे scrutiny होईल मगच तुम्हाला प्रोविजनल पासपोर्ट मिळेल. आता काय करायचं ? सुनीता बाई जवळ इतके दिवस हॉटेल मध्ये राहण्या साठी पैसेच नव्हते. त्यांना रडायला यायला लागलं. रंगनाथन ला काही माहीत नव्हतं. त्यानी खोदून खोदून सुनीता बाईंना विचारलं की काय प्रॉब्लेम आहे म्हणून. “हॉटेल वाला म्हणतो की ट्रॅवल चं बूकिंग आज संध्याकाळ पर्यंतच होतं. आता तुम्हाला इथे राहता येणार नाही कारण तुमच्या जवळ पासपोर्ट नाहीये. आणि तरीही ...Read More