सफर विजयनगर साम्राज्याची...

(7)
  • 63k
  • 1
  • 28.7k

आयुष्य हा एक प्रवास आहे..माणसाच्या जन्माअगोदरपासूनच शुक्राणूच्या रुपाने सुरु झालेला त्याचा हा प्रवास मरेपर्यंत सुरुच असतो, अगदी मृत्यूनंतरही आत्म्याच्या रुपात तो सुरुच असल्याची समजूत जनमानसात आहे. एकूणच काय तर माणूस आणि प्रवास हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच की काय, रोजची न चुकणारी कर्तव्ये पार पाडत असताना माणूस आनंद मिळवण्यासाठी, मनावर आलेला ताण हलका करण्यासाठी प्रवास करत असतो. असं मला वाटतं. माझ्याबाबतीत तरी हे तंतोतंत लागू पडते अशा आयुष्यरुपी प्रवासात एकदा तरी काही ठिकाणं पाहायला हवीत आणि त्या Must visit places मधील एक ठिकाण म्हणजे हंपी.. हंपी नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर येतं विजयनगर साम्राज्य !! आपली भारतीय संस्कृती किती महान आहे हे आपल्या देशातील या प्राचीन शहरातील वास्तूवरून लक्षात येते. हंपी येथील ऐतिहासिक ठेवा महत्वाचा आहे. म्हणूनच युनेस्कोने हंपीला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. इ. स.१४ व्या शतकात निर्माण झालेल्या आणि उत्कर्षाच्या उच्च ठिकाणी पोहचलेल्या एका वैभवशाली हिंदू साम्राज्याचे अवशेष आजही तेवढ्याच दिमाखात हंपी इथे उभे आहेत.. हंपी उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना तर आहेच शिवाय स्थापत्य कलेचा अभ्यास करणाऱ्यांशी ज्या आत्मीयतेने इथल्या मूर्ती संवाद साधतात तेवढ्याच आत्मीयतेने त्या सामान्य पर्यटकांशीही बोलतात.

Full Novel

1

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग १

आयुष्य हा एक प्रवास आहे..माणसाच्या जन्माअगोदरपासूनच शुक्राणूच्या रुपाने सुरु झालेला त्याचा हा प्रवास मरेपर्यंत सुरुच असतो, अगदी मृत्यूनंतरही आत्म्याच्या तो सुरुच असल्याची समजूत जनमानसात आहे. एकूणच काय तर माणूस आणि प्रवास हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच की काय, रोजची न चुकणारी कर्तव्ये पार पाडत असताना माणूस आनंद मिळवण्यासाठी, मनावर आलेला ताण हलका करण्यासाठी प्रवास करत असतो. असं मला वाटतं. माझ्याबाबतीत तरी हे तंतोतंत लागू पडतेअशा आयुष्यरुपी प्रवासात एकदा तरी काही ठिकाणं पाहायला हवीत आणि त्या Must visit places मधील एक ठिकाण म्हणजे हंपी..हंपी नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर येतं विजयनगर साम्राज्य !!आपली भारतीय संस्कृती किती महान आहे हे आपल्या ...Read More

2

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग २

मुंबईहून निघताना ट्रेन प्रवास सोयीस्कर वाटत नसल्याने ग्रुप लीडर्सनी वातानुकूलित स्लीपर बसची तिकीटे काढली..ही बस साधारण दुपारी तीनच्या दरम्यान सुटते आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर, हुबळी , गदग,हॉस्पेट असा प्रवास करून सकाळी 8 वाजता हॉस्पेटला पोहचते. तिथून रिक्षाने हंपीला जाण्यास अर्धा तास लागतो..नशिबाने आमची बस अगदी वेळेवर हॉस्पेटला पोहचली.. यदा कदाचित जर बस उशिरा पोहचली तर आपला दिवसाचा सर्व कार्यक्रम बिघडू शकतो..अर्थात हे आपल्या हातात नसते म्हणा..आमचे रिक्षावाले अगोदरच हॉस्पेटला येऊन थांबले होते. आठ जणांसाठी दोन रिक्षा पुरेशा होत्या. एका रिक्षात पाठी तीन आणि ड्रायव्हर शेजारी पुढं एकजण.. इथे मुंबईची आठवण आली.( मुंबईच्या चाकरमान्यांना अशा चौथ्या सीटवर बसून प्रवास करणे ...Read More

3

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ३

पोटभर रुचकर नाष्टा करून तृप्तीचा ढेकर दिला.. आता दुपारी वेळेत जेवायला उशीर झाला तरी चालू शकणार होते.आमच्या रिक्षा तयार आम्हाला हंपी दर्शन घडवून आणण्यासाठी..आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही गणपतीच्या दर्शनाने केली..आमच्या होम स्टेच्या जवळच असलेल्या हेमकूट टेकडीवरहे गणेश मंदिर आहे..हंपीचा इतिहास जरी तुम्ही वाचून गेला असलात तरी तिथला लोकल गाईड घ्यावा असं अनुभवाने मी सांगेन..त्यामुळे होते काय, आपण वाचलेल्यापैकी जे काही पॉइंट्स आपल्याकडून राहून जातात ते एकतर गाईडकडून कव्हर होतात आणि दुसरं म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांचे कमाईचे मुख्य साधन टुरिस्ट हेच आहे.. तर आपण नकळत त्यांना आर्थिक मदतही करत असतो. आम्हीही तिथला ऑफीशियल गाईड बरोबर घेतला.आता ज्या गणपती मंदिराबाबत मी ...Read More

4

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ४

उग्र नरसिंह मंदिर बघून आम्ही आता अशा मंदिराकडे निघालो की ज्याच वर्णन करताना शब्दही अपुरे पडतील.हे मंदिर फक्त हंपीची नसून संपूर्ण भारत देशाचे भूषण म्हणावे लागेल.हंपी, विठ्ठलपूरा येथील सुप्रसिध्द "विठ्ठल मंदिर"!!रिक्षाने विठ्ठलपूरा परिसरात पोहचल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिरापाशी जाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर चालत जावे लागते..ज्यांना पायी चालण्याचा कंटाळा येतो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरी कार उपलब्ध आहे.. पण सुट्टीच्या दिवशी त्यासाठी बरीच मोठी रांग असते.मला वाटतं, हळू हळू पायी चालत मुख्य मंदिर येईपर्यंत लागणारे बाजारपेठेंचे अवशेष, एक दोन छोटी मंदिरे आणि उजव्या हाताला असलेली अतिशय सुंदर अशी पुष्करणी हे बघत बघत जाणं जास्त उत्तम..यावेळी पाऊस चांगला झाल्याने पुष्करणी पाण्याने भरलेली ...Read More

5

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ५

विठ्ठल मंदिर पाहता पाहता दुपार होत आली.. बरीच पायपीट केल्याने सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. हंपी बघताना तुम्हाला तयारी ठेवावी लागते.. तरच तुम्ही मनापासून एन्जॉय करू शकता. अन् त्यासाठी वेळेवर अन्न आणि पाणी घेतलंच पाहिजे..आमच्या गाईडने आम्हाला तिथल्या एका स्थानिक खानावळीत नेलं. टेबल खुर्ची तर होत्याच पण त्याबरोबरच जमिनीवर गाद्या टाकून समोर बसक्या पद्धतीची जेवण ठेवण्यासाठी अशी टेबल साध्या भाषेत सांगयचं तर आपली भारतीय बैठक !! केळीच्या पानावर चपात्या, दोन तीन प्रकारच्या भाज्या, चटणी त्यावर तूप, भात, रस्सम आणि खास कर्नाटकी पद्धतीची गोड खीर.. एकंदरीत काय, पुन्हा माझी सकाळ सारखी स्थिती झाली.. अजिबात कशाची वाट न बघता मी ...Read More

6

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ६

सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हेमकूट टेकडी हे हम्पीमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे; आणि जवळच्या मातंगा टेकडीच्या तुलनेत माथ्यावर पोहोचणे अवघड नाही..या टेकडीवर साधारण तीस पस्तीस मंदिरांचा समूह आहे.. त्यातील काही विजयनगर साम्राज्य अस्तित्वात येण्या अगोदर बांधलेली असावीत.संपूर्ण टेकडीला दगडी तटबंदी आहे.. दोन मार्गाने इथे प्रवेश करता येतो.. दक्षिण बाजूला असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून किंवा बाजारपेठेत जे भगवान विरूपक्षाचे मंदिर आहे त्याच्या डाव्या बाजूने..आम्ही मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केला. टेकडीवर जाण्याअगोदर समोरचं ससिवेकलू गणेशाची आठ फुटी सुंदर मूर्ती दगडी मंडपात विराजमान झालेली पाहायला मिळते.या मूर्ती बाबतही एक कथा सांगितली जाते ती अशी एकदा खूप जास्त जेवण जेवल्याने गणेशाचे पोट इतकं फुगल की ...Read More

7

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ७

विरूपाक्ष मंदिरातून बाहेर पडलो आणि पोटपूजा करायला गेलो.. त्याआधी तिथल्या लोकल मार्केट मध्ये थोडी खरेदीही केली. इथे हंपी मधील चित्र असलेले टी शर्ट वाजवी दरात मिळतात.. सांगताना दुकानदार दुप्पट किंमत सांगतात, आपण योग्य घासाघीस केली की अर्ध्या किमतीत देतात..जेऊन परत रूमवर आलो. पहाटे लवकर सूर्योदय बघण्यासाठी मातंग टेकडी चढून जायचे असल्याने जास्त वेळ न काढता सरळ झोपून गेलो..पहाटे साडेचार वाजता गजराने आपलं काम चोख केलं. पटापट आंघोळ उरकून आम्ही सगळे तयार झालो.मातंग टेकडीच्या पायथ्यापर्यंत आम्ही रिक्षाने जाणार होतो व तिथून पाऊण तास ट्रेक करून टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते..बाजारपेठेपासून टेकडीच्या पायथ्याशी रिक्षाने जायला साधारण दहा मिनिटे लागतात.आम्ही अगदी वेळेत माथ्यावर ...Read More

8

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ८

सनातन धर्मात वृक्ष, वनस्पती, प्राणी आणि पक्षी तसेच जलस्रोतांना विशेष महत्त्व आहे. या धर्मात नद्यांना पवित्र आणि मातेसमान मानले आहे. तलावांबद्दल बोलायचे झाले तर, सनातन धर्मात ज्या पाच तलावांचे वर्णन केले गेले आहे आणि जे तलाव पौराणिक काळाशी संबंधित आहेत. असे मानले जाते की या तलावांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो.अशा पवित्र तलावांपैकी एक म्हणजे "पंपा सरोवर"कर्नाटक राज्यातील कोपल जिल्ह्यात आहे. हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये याचा समावेश आहे. त्यात स्नान केल्याने पुण्य मिळते आणि आत्मिक सुख प्राप्त होते अशी मान्यता असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने हिंदू धर्माला मानणारे भाविक पंपा सरोवरात स्नान करण्यासाठी येतात.कमळ फुलण्याच्या ...Read More